Home | News | ekta kapoor talks about her web series sexual content

आपल्या वेब सीरिजमधील सेक्शुअल कंटेन्टवर प्रश्न उभे राहिले तर बोलली एकता, 'पडदयावर सेक्स दाखवून खुश आहे आणि त्यात काही चुकीचेही नाही.'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 09, 2018, 12:01 AM IST

एकता कपूरने सांगितले कारण, का नाही देऊ शकली 'नागीण' मध्ये 'हॅरी पॉटर' सारखे इफेक्ट..

 • ekta kapoor talks about her web series sexual content

  मुंबईः एकता कपूरवर नेहमीच आरोप होत असतो की ती तिच्या वेब सिरीज, सीरिअल, टीव्ही शोच्या माध्यमातून सेक्स आणि अंधविश्वास दाखवत असते. आता तिने सर्वांना उत्तर दिले आहे. एकताचे म्हणणे आहे, 'जी गोष्ट प्रसिद्ध होते तिची सगळेच निंदा करू लागतात. एकटा म्हणाली मला याचे काहीही दुःख नाही की मी पडद्यावर सेक्स दाखवते.'

  एकता म्हणाली स्क्रीनवर सेक्स दाखवणे चूकीचे नाही..
  एकता कपूरने आपल्या स्टेट्मेंट्मध्ये सांगितले की, पडद्यावर सेक्स दाखवून मी खुश आहे. मला यात काहीही चुकीचे वाटत नाही. "याच्याशी आपल्याला काही समस्या असली नाही पाहिजे. माझ्या हिशेबाने समस्या ही आहे की आपलाकडे दोन प्रकारचे दात आहेत. खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे. आपल्याला प्रॉब्लेम तिथे वाटलं पाहिजे जिथे इच्छा नसताना सेक्स होतो. गुन्हा केला जातो." एकताचे प्रोडक्शन हाऊस ऑल्ट बालाजीच्या बॅनरखाली 'रोमिल अँड जुगल', 'रागिणी एमएमएस 3', 'देव डीडी', 'XXX' अशा वेब सिरीजमध्ये सेक्शुअल कन्टेन्ट खूप पाहायला मिळाला. तिची नवी वेब सिरीज अपहरण आहे ज्यासाठी तिने एक प्रेस कॉन्फरन्सही केली होती.

  आपला टीव्ही शो 'नागिण' चे कौतुकही केले..

  एकताने आपला टीव्ही शो नागिनविषयी सांगितले, हा एक फिक्शन शो आहे. मला हॅरी पॉटर आणि गेम ऑफ थ्रोन्स सारखे शोज पाहायला आवडतात. पण आपल्या शोमध्ये तसे इफेक्ट देता येत नाही कारण त्यांचे बजेट आपल्या तुलनेत 100 पट आहे. जेव्हा आमच्याकडे तेवढे बजेट असेल तेव्हा आम्ही तसे इफेक्ट नक्की देऊ.

Trending