आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने मिठाई खाण्याच्या स्पर्धेत केकचा मोठा घास तोंडात भरला, श्वास गुदमरुन झाला मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिलेला वाचवण्यासाठी सोबतच्या लोकांनी सीपीआर दिला, रुग्णालयात नेण्यापूर्वीच झाला मृत्यू

सिडनी- ऑस्ट्रेलियातील क्वींसलँडमध्ये सर्वात जास्त मिठाई खाण्याचे स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धेत एका 60 वर्षीय महिलेने भाग घेतला, पण ही स्पर्धा त्या महिलेच्या जीवावर बेतली. स्पर्धा जिंकण्यासाठी महिलेने एकामागे एक केकचे मोठे घास तोंडात भरले, त्यानंतर श्वास गुदमरुन महेलाचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील हार्वी बे बीच हाउस हॉटलमध्ये सर्वात जास्त मिठाई खाण्याची स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत एका 60 वर्षीय महिलेने भाग घेतला आणि स्पर्धा जिंकण्यासाठी महिलेने एकामागे एक केकचे मोठे घास तोंडात भरले. त्यानंतर महिलेला श्वास घेण्यास त्रास सुरू झाला, उपस्थित लोकांनी तिला सीपीआर देऊन वाचवण्याचा प्रयत्नदेखील केला, पण महिलेला वाचवण्यात त्यांना यश आले नाही.

'ऑस्ट्रेलिया डे'वर आयोजित केले जातात खाण्याच्या स्पर्धा


घटनेनंतर बीच हाउस हॉटलने फेसबूकवर मेसेज पोस्ट करुन महिलेच्या कुटुंबाप्रति आपले दुख व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खाण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. ऑस्ट्रेलिया डे दिवशी अनेक हॉटेल्समध्ये या स्पर्धा असतात. या दिवशी ऑस्ट्रेलियात येणाऱ्या पहिल्या यूरोपियन लोकांना आठवले जाते.