आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक योजनांत हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुंतवणूकदारांनी लोकसभा निवडणुकीकडे गुंतवणुकीची मोठी संधी म्हणून पाहिले आहे. परिणामी अनेक गुंतवणूकदार निवडणुकीशी संबंधित योजनेत पैसा गुंतवत आहेत. निवडणुकीचा निकाल काहीही लागो, आपल्या पैशाच्या तुलनेत स्वत:चा फायदा करून देण्याचे आश्वासन पोर्टफोलिओ मॅनेजमेंट प्रॉडक्ट ऑपरेटर्सकडून दिले जात आहे. यातून गुंतवणूकदारांची फसवणूक होण्याची शक्यता अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.
निवडणूक नियामक आणि अन्य संस्थांनी अशा योजनांतील गुंतवणुकीचे प्रमाण अद्याप निश्चित केले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार यामध्ये हजारो कोटी रुपये गुंतवणूक झाली आहे. अशाच काही योजनांमध्ये ‘सामूहिक गुंतवणूक योजना’ समोर आली आहे. यामध्ये गुंतवलेला निधी आगामी सरकारच्या महत्त्वाच्या क्षेत्रातील गुंतवणूक योजनांसाठी वापरण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
संबंधित योजना कोण चालवते याची माहिती उघड करण्यास नकार देत अधिकार्‍यांनी या व्यवहारात नव्या गुंतवणूकदारांना आणण्यासाठी दलाली देऊ केली जात असल्याचे सांगितले. गुंतवणुकीच्या काही योजना कायदेशीर तर काही बेकायदा आहेत. यामध्ये जनावरांच्या बाजाराप्रमाणे बोली लावली जाते.
या सगळ्यामध्ये सर्वात घातक गोष्ट म्हणजे जे लोक गुंतवणूकदारांना यासाठी प्रोत्साहन देतात, ते संबंधितांना शेअर, म्युच्युअल फंड, बाँड आणि अन्य मालमत्तेत पैसा गुंतवण्यास भाग पाडत आहेत. भांडवली बाजारातील अशा काही शक्यतांवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. म्युच्युअल फंड, विमा आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट प्रॉडक्ट्सच्या हालचालींवर त्या-त्या नियामकांचे लक्ष आहे.

सेबीचे अवैध निधीवर लक्ष
काही कायदेशीर पोर्टफोलिओ योजनांमध्ये ऑपरेटर्स लोकसभा निवडणुकीनंतर फायदा मिळू शकणार्‍या योजनांमध्ये निधी गुंतवतात. यामध्ये निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी गुंतवणूकदारांना आर्थिक सुरक्षेची हमी दिली जाते. या योजनेला कायदेशीर आधार दिला जात असला तर भांडवली बाजारावरील देखरेख संस्था सेबीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. उत्पादनांच्या गैरमार्गाने केलेल्या विक्रीमुळे गुंतवणूकदारांना धोका दिला जात असल्याचे अधिकार्‍याने सांगितले. लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे नोंदणीकृत कंपन्या निवडणुकीसाठी अवैध निधी भांडवली बाजारातून वळवतात काय, याकडे सेबी लक्ष ठेवून आहे.