आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतका पैसा येतो कोठून?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभा निवडणुकांच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तसतसे वातावरण तापत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी संपूर्ण देश दणाणून सोडला आहे. राज्याच्या विविध भागांत लाखो रुपयांची रोकड सापडत आहे. निवडणुकांदरम्यान पैसे सापडत असल्याने शंकाकुशंकांना पेव फुटले आहे. लपवलेला पैसा आता बाहेर पडत आहे, अशी चर्चा जनतेत होत आहे. मतदारांनी पैशाच्या आमिषाला बळी न पडता मतदान करणे अत्यावश्यक आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे 2014 हे वर्ष गल्ली व दिल्लीसाठी खूप महत्त्वाचे आहे. देशात निवडणुकांदरम्यान पडत असलेल्या आर्थिक आमिषांना जे बळी पडतात त्यांना पुढील पाच वर्षे पश्चात्ताप करण्याची पाळी येते. त्यामुळे पैशासाठी आपले इमान विकू नका. सध्या दिवस आणि रात्र दोन्ही वैर्‍याची आहे.

ई-मेलद्वारे