आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहतक : दीपेंद्रसाठी मातोश्री प्रचारात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत/ रोहटक - दीपेंद्र आजारपणामुळे प्रचारापासून दूर आहेत. त्यांच्या मातोश्री आणि मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या पत्नी आशादेवी यांनी प्रचाराची पूर्ण जबाबदारी उचलली आहे. एका दिवसात दहा-दहा कार्यक्रमांना त्या उपस्थित राहतात. दीपेंद्र यांची स्वप्न आणि बालपणीच्या आठवणी त्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात. राजकारण कमी, भावनिकता जास्त. विरोधकांना त्या विचारतात- तुमच्या सरकारने किती विकास केला? इकडे दीपेंद्र म्हणतात, रोहटकचे नाव आता राज्यस्तरावर पोहोचले आहे. आता देश आणि जागतिक पातळीवर पोहोचेल.
सांघी. मुख्यमंत्र्यांचे गाव. नव्हे विकसित कसबा. सर्वत्र पक्के रस्ते, प्रत्येक घर कॉँक्रिटचे. पॉलिटेक्निक, दूध संयंत्र आणि अनेक सुविधा. 70 वर्षीय संपत म्हणतात, गावाकडे संपूर्ण राज्याची सत्ता आहे. मग विकासाची गंगा का अवतरणार नाही. रोहटकमधील मोठय़ा, चकाकत्या रस्त्यांवरून आम्ही या गावात हे जाणून घेण्यासाठी पोहोचलो, की प्रत्येक ठिकाणी असा विकासाचा घोष होत असेल, तर विरोधकांचे म्हणणे ऐकणार कोण?
दुर्लक्षित जसिया गावात भाजप उमेदवार ओमप्रकाश धनखड लोकांना विश्वास देत होते- सत्ता कुठेही जाणार नाही. आता देशाचीच सत्ता नरेंद्र मोदींच्या हाती येणार आहे. मी त्यांचा निकटवर्तीय आहे. रात्री साडेदहा वाजता झोपेतून उठवून मोदींनी मला तिकीट दिले. गावातील वयस्क दुकानदार रोहिताशदेखील मोदींना चांगले नेते मानतात. परंतु म्हणतात सत्ता तर गावातच राहिली पाहिजे, म्हणून मत दीपेंद्र यांनाच देणार. कॉँग्रेस पिछाडीवर राहिली तरी, दीपेंद्र दोनदा खासदार झालेले आहेत. त्यांच्या आजोबापासून ते तिसर्‍या पिढीपर्यंत नऊ जणांनी येथून विजय मिळविला आहे. इनेलोतील उमेदवार शमशेर सिंह खरकडा यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा भूसंपादनातील गैरव्यवहार हा आहे. हरियाणात जातीयवाद फक्त येथेच प्रभावी असल्याचे दिसून येते. तीन जाट उमेदवारांच्या विरोधात आपचे नवीन जयहिंद हेच जाट नाहीत. त्यांचे कार्यकर्ते दोन गटांत विभागून प्रचार करतात. एकाचे नेत्तृत्व त्यांची पत्नी स्वाती करते. कुमार विश्वास त्यांचे स्टार प्रचारक आहेत. जे राहुल गांधींविरोधात लढताहेत. पण त्यांना गावात कोणीही ओळखत नाही.