आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election 2014 Sonia Gandhi Live Latest News In Marathi

सोनिया गांधी लाइव्ह : एका व्यक्तीसाठी भाजप मुखवटे वापरत आहे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलार (कर्नाटक) । काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. काही लोक पोस्टरच्या माध्यमातून आपला खरा चेहरा झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिखट वक्तव्य त्यांनी केले. कर्नाटकातील कोलार येथे त्यांनी मोदी यांचे नाव न घेता टीका केली.

एका व्यक्तीचा खरा चेहरा झाकण्यासाठी देशभरात मोठय़ा प्रमाणात पोस्टर्स लावण्यात आली आहेत. गुजरात मॉडेलबाबतही गवगवा केला जात आहे. गुजरातचे असे काही मोठेपण सांगितले जातेय, जसे अन्य राज्यांत काही कामेच होत नाहीत. गुजरातमधील महिला, मुले आणि आदिवासींना कुपोषणाचा सामना करावा लागतो ही वेगळी गोष्ट आहे.
.. जणू इतर राज्यांत काम झालेच नाही
लहान गोष्टी मोठय़ा प्रमाणावर सादर करण्याची काही लोकांची सवय असते. हल्ली तर गुजरातेत विकासाचे असेच चित्र दाखवले जात आहे. जणू इतर राज्यांत काही चांगले काम झालेच नसावे, अशा आवेशामध्ये ते सगळीकडे वावरत आहेत.
उत्तर प्रदेशात भाजपचा पर्दाफाश
काँग्रेस नेहमीच जात्यंधांविरुद्ध संघर्ष करत असते. मात्र जातीयवाद पसरवणे हा एकच भाजपचा अजेंडा आहे. उत्तर प्रदेशात त्यांच्या एका नेत्याच्या (अमित शही) वक्तव्यावरून याचा पर्दाफाश झाला आहे. त्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.
छायाचित्र - कोलारच्या सभेत सोनिया