Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | election app issue for users

निवडणूक आयोगाच्या अॅप्सवर मतदारांच्या तक्रारींचा पाऊस

आशिष देशमुख | Update - Mar 14, 2019, 12:16 PM IST

निवडणूक आयोगाने प्रथमच मतदारांच्या सोयीसाठी विविध मोबाइल अॅप्स तयार केली. मात्र अॅप्समध्ये प्रचंड त्रुटी असल्याचे समोर आ

 • election app issue for users

  औरंगाबाद - निवडणूक आयोगाने प्रथमच मतदारांच्या सोयीसाठी विविध मोबाइल अॅप्स तयार केली. मात्र अॅप्समध्ये प्रचंड त्रुटी असल्याचे समोर आले आहे. ‘गुगल प्ले’वरील फीडबॅकमध्ये या अॅप्सबाबत ७० टक्के नकारात्मक तर ३० टक्केच चांगल्या प्रतिक्रिया आहेत. आयोगाच्या वेबसाइटवर या सर्वच अॅप्सची माहिती आहे. त्यात सी-व्हिजिल, व्होटर हेल्पलाइन, ऑनलाइन व्होटर सर्व्हिस पोर्टल आदी अॅप्सचा समावेश आहे. ही सर्व अॅप रे-लॅब्स नावाच्या कंपनीने तयार केली असून कंपनीकडून फिडबॅकची उत्तरेही खूप उशिरा येत असल्याच्या तक्रारी आहेत. यात सर्वाधिक तक्रारी आचारसंहिता भंगाची तक्रार देण्यासाठी असलेल्या “सी-व्हिजिल’ अॅपबाबत आहेत. ओटीपी न येणे, मतदारसंघच गायब असणे, साइटचे सर्व्हर हँग व स्लो असल्याच्या तक्रारी आहेत.


  अॅप बाबतच्या कॉमेंट्स आणि रेटिंग.. सी व्हिजिल अॅपबाबत देशभरातील मतदारांच्या सर्वाधिक कॉमेंट्स
  सी-व्हिजिल
  - अॅप तयार करण्याचा प्रयत्न चांगला. पण तक्रारींची नोंद घेतली तर उपयोग होईल. मतदारांचे समाधान झाले पाहिजे. नावे गोपनीय ठेवली तरच निवडणूक काळात तक्रारी येतील. -सौरभ पांडा
  - फोटो अपलोड होत नाहीत, ओटीपीही येत नाही. अॅप अपडेट करावे. - संत प्रकाश


  व्हाेटर्स हेल्पलाइन
  - चांगले अॅप आहे पण ओटीपी येत नाही, दुरुस्ती करा. -प्रवीण कुमार
  - हे अॅप काही उपयोगाचे वाट नाही. सर्व्हर हँग होत आहे. ओटीपी येत नाही. सतत एरर येतो. मतदारसंघ बदलण्याचा अर्ज क्रमांक ६ या अॅपवरून भरण्याचा प्रयत्न केला पण काम झाले नाही. -आर.विनिश
  - माझे नावच मतदार यादीत नसल्याची तक्रार केली. उत्तर आले नाही. - हर्ष जोशी


  पीडब्ल्यूडी अॅप
  - मी दिव्यांग असून निवडणूक आयाेगाच्या या अॅपचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे अॅप चालत नाही. - मंजुनाथ वीरा
  - अॅपवरील बहुतांश अॉप्शन काम करत नाहीत - दिल्लाय नावानिधी एस.

Trending