आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचाराच्या तोफा थंडावल्या, सोमवारी होणार मतदान; उमेदवारांची धाकधूक वाढली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आज (शनिवारी) सायंकाळी सहा वाजता थंडावल्या. आचारसंहितेच्या नियमांनुसार आता कोणालाही जाहीर प्रचार करता येणार नाही. उमेदवारी अर्ज माघारीनंतर अवघे 12 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळाले होते. या काळात सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सभांचा धडाका लावला होता. राज्यात 21 तारखेला मतदान होणार असून 24 तारखेला निकाल लागणार आहेत. प्रचाराची धामधूम संपली असली तरी उमेदवारांची धाकधूक नक्कीच वाढली आहे. 

भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदींनी प्रचारसभा घेतल्या. काँग्रेसच्या वतीने माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी सभा घेतल्या. मात्र, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्या सभा झाल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सर्वाधिक सभा घेऊन वातावरण ढवळून काढले, तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यावरच या नवीन पक्षाच्या प्रचाराची धुरा होती. मनसेच्या वतीने एकमेव राज ठाकरेंनी प्रचार सभा घेतल्या. बहुतांश नेत्यांच्या सभांचा धडाका शुक्रवारीच संपला. मात्र, शनिवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या अकोला आणि कर्जत येथील सभा रद्द झाल्या. 

बातम्या आणखी आहेत...