आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 टक्केही युवांना नाही उमेदवारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ भोपाळ - देशात 14 कोटींहून जास्त मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. 18 ते 35 वयोगटातील एकूण 38 कोटी 30 लाख मतदार आहेत. म्हणजे एकूण 81.5 कोटी मतदारांपैकी अध्रे तरुण आहेत. या वयातील किती मतदार आपला हक्क बजावतात अशीही एक शंका व्यक्त केली जाते. याचे कारण म्हणजे काश्मीरमध्ये गेल्या वेळी 31 टक्के मतदान झाले होते. त्यातील 50 टक्के मतदारांचे वय 18 ते 35 वष्रे होते. काँग्रेसने जाहीरनाम्यात पहिल्यांदा म्हटले होते- राहुल 50 टक्के तिकीट तरुणांना देण्याच्या बाजूने आहेत. आता तरुणांना राजकारणात आणले पाहिजे, अशी संघानेही भूमिका घेतली आहे. अडवाणी यांना याच कारणामुळे बाजूला सारले आहे.

18 ते 35 वयोगटातील तरुण मतदार 50 टक्के असेल, तर भाजप किंवा काँग्रेस 35 वर्षांपर्यंतचे 50 टक्के उमेदवार उभे करू शकले असते? याचे उत्तर होकारार्थी नाही. दोन्ही पक्षांनी 400 ते 425 उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, यात 10 टक्के तरुणांनाही तिकिटे दिली नाहीत.

काँग्रेस
देशातील या जुन्या पक्षाने 416 तिकिटांचे वाटप केले आहे. उमेदवारी अर्जात नमूद केलेल्या वयानुसार 32 तिकिटे 40 वर्षांपेक्षा कमी वय असणार्‍यांना दिली आहेत. यामध्ये सर्वात कमी वय 27 वर्षांचे मेघालयचे विल्यम चेरन मोमीन यांचे आहे. येथील मतदान झाले आहे. सर्वात कमी वयाच्या खासदाराला निवडून देण्याचा मान याच मतदारसंघाकडे जातो. याआधी येथून माजी लोकसभा अध्यक्ष पी.ए. संगमा यांची कन्या अगाथा संगमा निवडून आल्या होत्या. विल्यम यांची लढत पी.ए. संगमा यांच्याशी होत आहे.
- राज्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास 40 वर्षांपेक्षा कमी वयाला सर्वात जास्त 5 तिकिटे काँग्रेसने उत्तर प्रदेशात दिली.

भाजप
भाजपने सर्वाधिक 400 तिकिटे वाटली आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या व उपलब्ध प्रतिज्ञापत्रानुसार भाजपने जवळपास 38 तिकिटे 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांना दिली आहेत. यामध्ये सर्वात कमी नंदुरबारच्या डॉ. हिना गावित (25) यांचे आहे. एमबीबीएसनंतर एमडी करत असलेल्या हिना यांनी काँग्रेसचे दिग्गज माणिकराव गावित यांना आव्हान दिले आहे. हिना यांचे वडील विजयकुमार गावित महाराष्ट्र सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कोट्यातून मंत्री होते. हिना यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांचे मंत्रिपद काढून घेण्यात आले.
- 40 वर्षांपेक्षा कमी वय असणार्‍यांमध्ये उत्तर प्रदेशात नऊ, राजस्थानमध्ये पाच आणि केरळमध्ये चार जणांना तिकिटे दिली.