आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission Exploring Voting Through Internet News In Marathi

अनिवासी भारतीयांना करता येईल इंटरनेटच्या माध्यमातून मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अनिवासी भारतीयांना इंटरनेटच्या माध्यमातून मतदान करता यावे या दिशेने प्रयत्न करीत असल्याचे आज (सोमवार) निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. या सुविधेनंतर अनिवासी भारतीयांना मतदानासाठी भारतात येण्याची गरज भासणार नाही आणि भारताच्या निवडणुकीत सक्रीय सहभागही नोंदविता येईल.
परंतु, न्यायाधीश के. एस. राधाकृष्णन यांच्या खंडपिठाला निवडणूक आयोगाने सांगितले, की चालू लोकसभा निवडणुकीत अशा स्वरुपाची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य नाही. जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या दिशेने प्रयत्न केले जातील. परंतु, ही सुविधा कधी उपलब्ध होईल याचा नेमका कालावधी देता येणार नाही.
दरम्यान, याच निवडणुकीत निवडणूक आयोगाने काही तरी करून अनिवासी भारतीयांना मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे, असे खंडपिठाने सांगितले आहे.
मतदार यादित नाव असलेल्या अनिवासी भारतीयांना किमान पोस्टाच्या माध्यमातून मतदान करता येईल ना, असे खंडपिठाने विचारले असून इंटरनेटच्या माध्यमातून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अद्याप तुमच्याकडे वेळ आहे, असेही सुचविले आहे.
यासंदर्भात सर्व शक्यतांवर काम करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे, असे आयोगाने सांगितले आहे. यावर न्यायालय म्हणाले, की 11,844 नोंदणीकृत अनिवासी भारतीय मतदारांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा.
यावर आता 11 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.