आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Election Commission For JD(U) Poll Symbol 'arrow', Not Use In Jharkhand Maharashtra Election

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये 'जदयू' आपले निवडणूक चिन्ह वापरू शकणार नाही, या कारणामुळे निवडणूक आयोगाने घेतला निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- निवडणूक आयोगाने बिहारमधील सत्ताधारी पक्ष जनता दल यूनाइटेड(जदयू)ला आपले निवडणूक चिन्ह 'बाण' झारखंड आणि महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीत न वापरण्याचे आदेश दिले आहे. आयोगाने सांगितले की, झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि महाराष्ट्रातील शिवसेनेचेही 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह आहे. हे चिन्ह जदयूच्या चिन्हाशी मिळते-जुळते आहे.

निवडणूक आयोगाने जदयूला आपले निवडणूक चिन्ह न वापरण्याचा आदेश 16 ऑगस्टला दिला आहे. सुरुवातील निवडणूक आयोगाने काही नियम सांगून जदयूला चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती, पण नंतर झामुमोने आयोगाला हे चिन्ह न वापरू देण्याची अपील केली. दोन्ही राज्यात सारखे चिन्ह असल्यामुळे मतदार गोंधळात पडू शकतात.