आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Election Commission Issues Notice To Babanrao Lonikar On His Controversial Statement

बबनरावांचे मतदारांना लोणी; वादग्रस्त वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने जारी केली नोटीस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशिष गारकर 

परतूर - निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना संबोधित करताना ‘मी सगळ्या तांड्यात पैसे दिले आहेत, म्हणून या निवडणुकीत आपल्याला भीती वाटत नाही’, असे वादग्रस्त विधान करून परतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशा आशयाची तक्रार मतदारसंघातील मोहाडी तांडा येथील विजय पवार यांनी निवडणूक विभागाकडे केली आहे. तांड्याच्या विकासासाठी निधी दिला असा यामागचा उद्देश होता, व्हिडिओमध्ये तोडफोड करून कोणीतरी खोडसाळपणा केला, असे स्पष्टीकरण याबाबत बबनराव लोणीकर यांनी दिले आहे. 

दरम्यान, या तक्रारीला अनुसरून निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी लोणीकर यांना खुलासा सादर करण्याबाबत नोटीस बजावली आहे. ‘तांड्यामध्ये कमळाच्या फुलाला लीड आहे, सगळ्या तांड्यात मी पैसे दिले आहेत, आणि म्हणून, या निवडणुकीत मला काही भीती वाटत नाही. आपण सगळे माझ्यासोबत आहात, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आपण सगळ्यांनी मोदीजींच्या सभेला जायचं आहे.” अशा आशयाचा व्हिडिओ मोदींच्या सभेच्या दिवशी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बुधवारी परतूर येथे पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होती. या सभेचे आमंत्रण देण्यासाठी भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी मतदारसंघातील अनेक वाडी-वस्त्यांमध्ये जाऊन पदयात्रा काढल्या होत्या. नेर परिसरातील तांड्यावर मतदारांना संबोधित करताना लोणीकर यांनी हे विधान केले आहे. ही बाब निवडणूक आयोगाचे निर्देश आणि आदर्श आचारसंहिता या दोन्हींचे उल्लंघन करणारी आहे, असे विरोधकांनी म्हटले आहे.
 

उमेदवारी रद्द करा : काँग्रेस
‘जिंकण्यासाठी लाेणीकर भ्रष्ट मार्गांचा अवलंब करत आहेत, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आचारसंहिता भंगाचा गुन्हा दखल करून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी,’ अशी मागणी काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
 

निधी दिला असे सांगायचे होते 
मतदारसंघातील विविध तांड्यांच्या विकासासाठी आपण निधी दिला असे सांगण्याचा माझा उद्देश होता, गाव खेड्यातील लोकांना निधी दिला हा शब्दप्रयोग उमजण्यास अवघड जातो, म्हणून तांड्यांना पैसे दिले असे आपण सांगितले. आपल्या विधानाचा विपर्यास करून, व्हिडिओमध्ये तोडफोड करून खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सगळ्या भाषणाची व्हिडिओ क्लिप आपल्याकडे आहे.
- बबनराव लोणीकर