आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Election Commission Issues Notice To Niti Ayog Vp Rajiv Kumar For Criticising Rahul

काँग्रेसच्या आश्वासनावर टीका करून अडकले निती आयोगाचे उपाध्यक्ष, निवडणूक आयोगाने बजावला नोटीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावले आहे. त्यांनी निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने दिलेल्या आश्वासनावर टीका केली. काँग्रेसची कथित योजना लागू झाल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान होईल असे ते म्हणाले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देशात आपल्या पक्षाची सत्ता आल्यास किमान उत्पन्न योजना लागू करणार असे म्हटले होते. या योजनेत देशातील 5 कोटी गरीब कुटुंबांना दरवर्षी 72000 रुपये थेट बँक खात्यात मिळतील असे राहुल म्हणाले होते. आता निवडणूक आयोगाने राजीव कुमार यांना उत्तर देण्यास सांगितले आहे.


राहुल गांधी यांच्या आश्वासनावर टीका करताना कुमार यांनी एक ट्वीट केले होते. सुत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने हे ट्वीट आचारसंहितेचे उल्लंघन मानले आहे. हे प्रकरण एखाद्या पक्षाच्या नेत्याने दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावर टीका करण्यासारखे साधारण नाही. या ठिकाणी टीका करणारे एक प्रशासकीय अधिकारी आहेत. ते देशाच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळेच, निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ट्वीटमध्ये राजीव कुमार म्हणाले, की राहुल गांधींनी दिलेले आश्वासन निवडणुकीनंतर पूर्ण न होऊ शकणारे आश्वासन आहे. त्यांचे आश्वासन देशाच्या आर्थिक निकषांवर खरा ठरू शकत नाही. 

बातम्या आणखी आहेत...