आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीत काळ्या पैशांवर निर्बंध घालण्यासाठी निवडणूक आयोगाकडून टोल फ्री नंबर जारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काळ्या पैशांवर निर्बंध घालण्यासाठी निवडणूक आयोगाकडून टोल फ्री क्रमांक जारी. विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. पुढील महिन्यात 21 ऑक्टोबरला मतदान होत आहे, तर 24 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. या निवडणुकीमध्ये पैशांचा गैरवापर होऊ नये यासाठी प्रसासनाने विशेष काळजी घेतली आहे. निवडणुकीत काळ्या पैशाच्या वापरावर प्रतिबंध लावण्यासाठी निवडणूक आयोगाने आयकर विभागाच्या अन्वेषण सुविधांचा वापर करण्याचे ठरवले आहे. 
निवडणुकीत होणाऱ्या पैशांच्या गैर वापरावर निर्बंध घालण्यासाठी आयकर महासंचालक पुणे, यांचे कार्यालय रोख व इतर मौल्यवान देवाण घेवाणीवर, राज्य व इतर केंद्रिय विभागांच्या समन्वयाने तसेच, स्वतः बारीक लक्ष ठेवून असणार आहे. जर कोणी पैशांच्या गैरव्यवहारात दोषी आढळले, तर त्याच्यावर कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार त्यांच्याकडे असतील.या दृष्टिकोनातून, पुणे आणि नागपूरमध्ये 24/7 नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या संदर्भात काळ्या पैशांच्या तक्रारी/माहिती दाखल करण्याकरता पुण्यासाठी दोन टोल फ्री क्रमांक, 1800-233-0700 आणि 1800-233-0701 उपलब्ध आहेत. तसेच, 7498977897 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आणि 020-24268825 या फॅक्स क्रमांवरही माहिती देऊ शकतात. नागपूर साठी टोल फ्री क्रमांक 1800-233-3785 आहे. तसेच, 9403391664 हा व्हॉट्सअॅप क्रमांक आणि 0712-2525844 हा फॅक्स क्रमांक असेल.या सोबत नागरिकांनाही आवाहन करण्यात आले आहे की,  मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणूका पार पडण्यासाठी आणि निवडणुकांमध्ये काळ्या पैशांच्या वापर टाळण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉल करुन पुराव्यासकट माहिती द्यावी. 

बातम्या आणखी आहेत...