आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या तारखांची आज होणार घोषणा? संध्याकाळी 5 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा होऊ शकते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे जारी केले आहे. त्यामुळे, याच पत्रकार परिषदेत महत्वाच्या तारखा समोर येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. एवढेच नव्हे, तर येत्या काही दिवसांत 4 राज्यांमध्ये सुद्धा निवडणुका होणार आहेत. सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि आंध्र प्रदेश अशी ही चार राज्य आहेत. या राज्यांतील निवडणुकीच्या तारखा सुद्धा रविवारीच जाहीर होतील असे सांगितले जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आचारसंहिता सुद्धा लागू केली जाते. सुत्रांच्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवणडणूक 7 ते 8 टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे.

 

यापूर्वी 2004 मध्ये रविवारीच झाली होती घोषणा
निवडणूक आयोगाकडून सहसा रविवारी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली जात नाही. तरीही आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी रविवारचा दिवस निवडला आहे. यापूर्वी 2004 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा रविवारीच करण्यात आली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि दिग्गज नेते शरद पवार यांनी देखील मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीच्या घोषणा होणार अशी शक्यता वर्तवली होती. तर काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यासाठी होणाऱ्या विलंबावरून निवडणूक आयोगावरच निशाणा साधला होता. 2014 च्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जून रोजी संपुष्टात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...