आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Election Commission Of India: Maharashtra Assembly Election 2019 Dates Announcement Live News And Live Updates

महाराष्ट्र, हरियाणात विधानसभेचे बिगुल वाजले; एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबर रोजी मतदान, 24 तारखेला निकाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई / नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन बहुप्रतीक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. महाराष्ट्रासह हरियाणा विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घेतली जाणार आहे. यात 21 ऑक्टोबरला मतदान आणि 24 तारखेला निकाल जाहीर केले जातील. अर्थातच निवडणुकीची ही संपूर्ण प्रक्रिया दिवाळीपूर्वीच संपणार आहे.

अशा आहेत दोन्ही राज्यांत निवडणुकीच्या तारखा
- 27 सप्टेंबर रोजी नोटिफिकेशन जारी केली जाणार आहे.
- 4 ऑक्टोबरपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येईल.
- 5 तारखेला इच्छुक उमेदवारांच्या अर्जांची तपासणी केली जाईल.
- 7 ऑक्टोबरपर्यंत त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.
- 21 ऑक्टोबर रोजी दोन्ही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होईल.
- 24 तारखेला मतमोजणी केली जाणार आहे.

सर्वच राजकीय पक्षांना आवाहन
निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना प्लास्टिक बंदीचे आवाहन केले आहे. प्रचार सामुग्रीत त्यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा. तसेच पर्यावरणपूरक अशा निवडणूक पार पाडण्यात सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.


मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे, 1 सप्टेंबर रोजी निवडणुकीच्या तारखांसाठी सुरक्षितता आणि इतर गोष्टींचा आढावा घेतला. तसेच दोन्ही राज्यांमध्ये निःपक्षपातीपणे निवडणुका होण्याची खात्री करून घेतली. दोन्ही राज्यांमध्ये पारदर्शक मतदानासाठी निवडणूक आयोगाने पूर्व तयारी केली आहे. यासाठी प्रत्येक ठिकाणी जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी तपास केला. महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर तर हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 2 नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर दोन्ही राज्यांमध्ये 24 तास पोलिस बंदोबस्त लावला जाईल असेही आयोगाने स्पष्ट केले. निवडणुकीत सोशल मीडियावर देखील निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष राहणार आहे. राजकीय पक्ष, उमेदवारांकडून सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने होईल याची काळजी आयोगाकडून घेतली जाईल.

MahaElection : 8.94 कोटींवर मतदार निवडणार 288 आमदार, विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज
 

MahaElection : युतीत जागावाटपाचे त्रांगडे सुटणार कसे? भाजपने २०१४ मध्ये सेनेच्या पूर्वीच्या ३९ जागा जिंकल्या,
शिवसेनेचाही भाजपच्या ५ जागी झेंडा  


जागावाटप : शिवसेनेला साेडावे लागेल 55 मतदारसंघांवर पाणी, दाेनदा पराभूत जागांच्या अदलाबदलीत भाजपला लाभ 


MahaElection : महाराष्ट्र विधानसभेत केवळ सात टक्केच महिला आमदार; 2014 मध्ये 20 जणींनाच संधी; सहा दशकांत आजवर एकही महिला मुख्यमंत्री नाही  MahaElection : भाजपच ड्रायव्हिंग सीटवर; शिवसेनेला युतीची अपरिहार्यता, निवडणूक विश्लेषक यशवंत देशमुख यांचे विश्लेषण

बातम्या आणखी आहेत...