आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅपवर उमेदवारांचा प्रचार करणे पडले महागात; निवडणूक आयोगाने नांदेडमधील 12 ग्रुप अॅडमिनला पाठवली नोटीस

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - निवडणूक आयोगाच्या मीडिया सर्टिफिकेशन आणि मॉनिटरिंग कमिटी (एमसीएमसी) ने नांदेड मध्ये 12 व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. दरम्यान ज्या मेसेजसाठी नोटिस पाठवण्यात आली, ते मेसेज ग्रुप अॅडमिन्सनी पाठवले नव्हते. ते मेसेज त्यांच्या ग्रुपमध्ये पोस्ट करण्यात आले होते. दरम्यान निवडणूक आयोगाने मुंबईत 4 फेसबुक पेजेसला देखील नोटीस जारी केली आहे. या सर्व ग्रुप्सवर आयोगाच्या परवानगीशिवाय व्हॉट्सअपवर उमेदवारांचा प्रचार करण्याचा आरोप आहे.  
 

निवडणूक आयोगाचे काय म्हणणे आहे?
 

नांदेड एमसीएमसीचे प्रमुख राजेंद्र चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार,
> उमेदवाराला प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला प्रचार करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते. उमेदवाराने परवानगी न घेता कोणत्याही माध्यमातून प्रचार केल्यास त्यांच्याविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येतो. 
> आचारसंहिता लागू असताना ज्यावेळी एखाद्या खासगी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एखाद्या उमेदवाराला मत देण्यास किंवा न देण्यास प्रवृत्त करणारे मेसेज पोस्ट करणे आचारसंहितेचे उल्लंघन आहे.
> जर कोणी त्या मेसेजचा स्क्रीन शॉट निवडणूक आयोगाच्या 'cVigil' अॅपवर पाठविला तर निवडणूक आयोग आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी त्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनला जबाबदार मानते. 
> हा नियम फेसबुक आणि ट्विटरवर देखील लागू आहे. दरम्यान हा मेसेज कोणत्या पक्षाचा किंवा उमेदवाराच्या विरोधात आहे हे महत्त्वाचे नसते.
 

आतापर्यंत 1200 तक्रारी आल्या आहेत 
राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून cVigil अॅपवर आतापर्यंत 1200 तक्रारी आल्या आहेत. सध्या नांदेडमध्ये पाठविलेल्या या नोटिसींमध्ये या 12 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अॅडमिनला आपल्या ग्रुपवरील सर्व प्रकारचा निवडणूक प्रचार बंद करणे तसेच एका आठवड्यात आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.