आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्या बायोपिकवर अखेर बंदी, नमो टीव्हीबाबत अद्याप निर्णय नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी बुधवारी निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन मानत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिक प्रदर्शनावर बंदी घातली. नमो टीव्हीविरुद्धच्या तक्रारींवर विचार सुरू असल्याचे आयोगाने म्हटले आहे. बुधवारी दुपारी आयोगाच्या प्रवक्त्याने नमो टीव्हीवरही बंदी घातल्याचे म्हटले होते. मात्र, रात्री उशिरा अजून निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

सरकारचे गोडवे गाणाऱ्या दोन टीव्ही मालिका निर्मात्यांना नोटिसा
‘भाभीजी घर पर हैं’मध्ये  होत्या सरकारी योजना

सरकारच्या विविध योजनांचा प्रचार करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने दोन टीव्ही मालिकांच्या निर्मात्यांनाही नोटीस जारी करत उत्तर मागितले आहे.अँड टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या भाभीजी घर पर हंै आणि झीटीव्हीवर प्रसारित होणाऱ्या  तुझसे है राब्ता या मालिकांच्या निर्मात्यांना एक दिवसाच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे. 


पण, वेब सिरीजमध्ये सरकारी प्रचार सुरूच
निवडणूक आयोगाने मोदींच्या चरित्रपटावर बंदी तर घातली, पण ‘मोदी-जर्नी ऑफ ए कॉमन मॅन’या वेब सिरीजचे काही भाग इरोज या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. वेब सिरीजचे दिग्दर्शक उमेश शुक्ला म्हणाले की, निवडणूक आयोगाला आक्षेप असावा असा कंटेंट सिरीजमध्ये नाही. मात्र, या वेब सिरीजविरुद्ध आयोगाला कुठलीही तक्रार मिळाली नाही.


एनटीआर-केसीआर बायोपिकवरही बंदी
आचारसंहितेचे उल्लंघन मानत निवडणूक आयोगाने एनटीआर यांचे बायोपिक लक्ष्मी-एनटीआर आणि केसीआर नावाने प्रसिद्ध तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे बायोपिक ‘उद्यम सिंघम’या चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घातली. दूरदर्शनने सर्वच राजकीय पक्षांच्या संतुलित बातम्या दाखवाव्यात, असे निर्देश आयोगाने दिले आहेत.