Home | National | Other State | Election drama creating from Smruti Irani education

काँग्रेसचा स्मृती इराणींना टोमणा-‘क्योंकि मंत्री भी कभी ग्रेजुएट थी’ ही नवी मालिका येत आहे, रोज पदवी बदलते

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 13, 2019, 09:06 AM IST

स्मृती इराणींनी अमेठीतून भरला अर्ज, शपथपत्रात बीकॉम-१ उत्तीर्ण दाखवले

 • Election drama creating from Smruti Irani education

  नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी गुरुवारी अमेठीतून उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी बी.कॉम-१ उत्तीर्ण असल्याचा शपथपत्रात उल्लेख केला. त्यानंतर काँग्रेसने इराणींच्या पदवीवरून टीका केली. काँग्रेस प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदींनी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या टीव्ही मालिकेच्या थीम लाइनवर इराणींवर हल्ला केला. त्या म्हणाल्या- ‘क्योंकि मंत्री भी कभी ग्रेजुएट थी’ ही नवी मालिका येत आहे-तिची लाइन असेल- ‘पात्रतेचे रूप बदलत आहे. नव्या साच्यात आहे, एक डिग्री येते, एक डिग्री जाते, शपथपत्र नवे येत आहे.’ स्मृतींनी एक गोष्ट कायम ठेवली आहे की कशा पद्धतीने ग्रॅज्युएटपासून १२ वी पास होतात.’

  स्मृती पदवीधर आहेत की नाही यावर १५ वर्षांपासून वाद सुरू

  > 2004: स्मृतींचा २००३ मध्ये भाजपत प्रवेश. २००४ मध्ये चांदणी चौकातून लढल्या. शपथपत्रात दाखवले की, १९९६ मध्ये डीयूतून कॉरस्पॉन्डन्सद्वारे बी.ए. केले.

  > 2011: गुजरातमधून स्मृती यांची राज्यसभेवर निवड. तेव्हा शपथपत्रात म्हटले की, डीयूच्या स्कूल ऑफ कॉरस्पॉन्डन्सद्वारे १९९४ मध्ये बीकॉम पार्ट-१ केले आहे.

  > 2019: अमेठीत अर्ज दाखल केला. त्यात त्यांनी पुन्हा दाखवले की, १९९४ मध्ये बीकॉम पार्ट-१ उत्तीर्ण केले. त्यांनी २०१४ आणि २०१७ मध्येही ही बाब सांगितली.

  > एका मुलाखतीत इराणींनी म्हटले होते की, माझ्याकडे येल विद्यापीठाची पदवी आहे. वाद झाल्यावर त्यांनी मान्य केले होते की, हे प्रमाणपत्र होते. खासदारांना ६ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर ते मिळते.

  काँग्रेसने कितीही अपमान करावा, मी थांबणार नाही..

  स्मृती म्हणाल्या- ‘काँग्रेसने कितीही अपमान करावा, तो पक्ष मला रोखू शकत नाही. टीका करणे त्यांचा अधिकार आहे. ते जेवढे अपमानित करतील तेवढ्या ताकदीनेच मी त्यांच्याशी लढेन. मी नामदाराच्या विरोधात लढत आहे.

Trending