आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्शन एक्स्प्रेस : ‘17 वर्षांची मैत्री, 7 वर्षे सत्ता; आता एकमेकांना आव्हान’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेश ते बिहारदरम्यानचा प्रवास महत्त्वपूर्ण टप्प्यांतून पार पडला. सोनिया गांधी यांची रायबरेली, राहुल यांचे अमेठी आणि आता हर-हर महादेवऐवजी हर-हर मोदीचा नारा दिला जाणारे वाराणसी.

रायबरेली येताच जवळच बसलेल्या गुरमित कौर खिडकीकडे बघत म्हणाल्या, ‘अरे, हे तर मोठे स्थानक आहे.’ पतीने उत्तर दिले, ‘गांधी कुटुंबाचा भाग आहे भाऊ, मोठे तर असणारच.’ पती दलबीरसिंह पाटण्यातील कॉलेजमध्ये प्राचार्य आहेत. गुरमित पक्क्या कॉँग्रेस समर्थक असल्याचे ते म्हणाले. त्यांचे आजोबा कटिहारमधून दोन वेळेस आमदार म्हणून निवडून आले होते. गुरमित म्हणाल्या, नितीशजींनी आम्हा दोघांना फोन केला होता. मला वाटले, तगडा संपर्क आहे. मला आश्चर्यच वाटले. त्यांना काय ते कळाले आणि म्हणाले, ‘अगं, तो संगणकाचा फोन असतो... हा तो आला होता.’ नितीश यांनी भाजपशी संबंध तोडून चूक केल्याचे त्या म्हणाल्या. बिहारला डुबवले. जेडीयू प्रादेशिक, तर भाजप राष्ट्रीय पक्ष. सात वर्षे एकत्र सत्ता आणि 17 वर्षांची मैत्री होती. मात्र, सध्या ज्याची स्थिती चांगली तिकडे लोक जात आहेत. बिहारमधील किती तरी लोक भाजपशी जोडले आहेत. अगदी पासवान आणि लालू यांचे सगेसोयरेही.

राजीव राज यांनी तर संपूर्ण लालूपुराण ऐकवले, ‘कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री होते तेव्हा लालू यांनी त्यांच्यासोबत संपर्क वाढवला. यानंतर फोडाफोडीत ते मुख्यमंत्रीही झाले. यानंतर त्यांना जे वाटले ते त्यांनी केले. लालूंचा त्या वेळचा आवेश असा होता की, ते नोकरशहांना बोलावून खैनी लावण्यास सांगत होते. सुरुवातीला ते खूप प्रसिद्ध होते, आता थोडे शांत झाले आहेत. हेमामालिनीच्या गालासारखा रस्ता करेन, असे सांगत होते. सर्व काही उलटे भाषण देत होते. ते रेल्वेमंत्री चांगले होते. मात्र, चारा घोटाळा खूप वाईट केला.’ निवडणूक रेल्वे घोटाळ्यांतून फिरून भ्रष्टाचारविरोधी अरविंद केजरीवाल यांच्याजवळ येऊन ठेपली. बिहारमध्ये केजरीवाल यांचे वातावरण कसे आहे? खरे सांगू का, केजरी संकल्पनाच समजत नाही. कुण्या मुख्यमंत्र्यांना धरणे देणे शोभते काय? प्रत्येक गोष्टीची हमी घेण्यात आली. ‘बडबडे कुठले?’ राजकिशोर हस्तक्षेप करत म्हणाले, ते काम चांगले करू शकले असते. बाकी सगळे नेते तर लुटारू आहेत. मात्र, एक चांगले कामही झाले. केजरी इफेक्टमुळे पहिल्यांदाच डॉक्टर-इंजिनिअर निवडणूक लढण्यास उत्सुक आहेत.

दिवाकर तेजस्वी आम आदमी पार्टीचे उमेदवार आहेत. आयएएस पुत्र आणि हार्वर्डमधून शिकून आलेले अक्षय वर्मा यांनी आपला पक्ष स्थापन केला आहे. ते केवळ 28 वर्षांचे आहेत. सुमेर झाएवढेच त्यांचे वय असावे. राजकीय स्वाभिमान ही त्यांची मुख्य चिंता आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना अहंकार होईल. बिहारचे मंत्री स्वत:ला राजा समजतात आणि नातेवाइकांना राजघराणे. दानापूर येताच पिशवीची आवराआवर करत एखाद्या तज्ज्ञासारखे मत व्यक्त केले. उत्तर प्रदेशने देशाला 8 पंतप्रधान, तर बिहारने 8 रेल्वेमंत्री दिले. यामुळे सर्वाधिक रेल्वे बिहारला मिळतात. स्वातंत्र्यानंतर ही पहिलीच वेळ आहे, ज्या सरकारमध्ये बिहारचा एकही मंत्री नाही. वाजपेयी सरकारमध्ये सर्वाधिक मंत्री बिहारचे होते. येथील एकूण 11 मंत्री होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे दोन खासदार अपात्र ठरण्याची घटनाही पहिल्यांदाच घडली. त्यांना निवडणूक लढण्यावरही बंदी लादण्यात आली. त्यापैकी सारणचे खासदार लालूप्रसाद यादव आणि जहानाबादचे जदयू खासदार जगदीश शर्मा.
पुढील स्थानक गुवाहाटी...