आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्शन एक्स्प्रेसमधून : नेत्यांसाठी जनता म्हणजे जणू एक खुळखुळाच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शताब्दी एक्स्प्रेसमधून - ‘कृपया लक्ष द्या, भोपाळहून झाशी, ग्वाल्हेर, आग्रा, मथुरामार्गे नवी दिल्लीला जाणारी 12001 शताब्दी एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर लागली आहे.’ चेअर कार डब्यातील मध्यवर्ती टेबल, वृत्तपत्र आणि मासिके पडलेली आहेत.
दोन्ही बाजूचे लोक पहिले पान उलटतात आणि त्याबरोबर त्यांना हसू फुटते. त्यापैकी एक दिल्लीकर चर्चेची दिशा ठरवतो. साधारण घोषणेच्या आवेशात- दिल्लीत केवळ केजरीवाल यांचीच चलती असेल. सर्वांच्या चेहर्‍यावर आश्चर्य आणि प्रश्नार्थक भाव उमटतात. त्याच वेळी तो समजावण्याचा प्रयत्न करत म्हणतो, लोकांना वाटते केजरीवालांना ऑटोचालकांनी जिंकून दिले. पण मला तुम्ही सांगा, ज्या गोल मार्केट भागातून ते निवडून आले तिथे किती ऑटोचालक आहेत? जवळच बसलेल्या छाया गुप्ता यांना त्याचे आश्चर्य वाटते. त्या म्हणतात, गेल्या वेळी कॉँग्रेसला मत दिले होते आणि तो पक्ष हरला. आता मी हरणार्‍यांना मत देणार नाही. यादरम्यान प्रशांत कौशिक यांनी चर्चेत भाग घेतला आणि म्हणाले, या वेळी भाजपच जिंकणार. गेल्या वेळी केजरीवालांचा अनुभव घेतला. चांदनी चौकातून कॉँग्रेसचे कपिल सिब्बल, आम आदमी पार्टीचे आशुतोष आणि भाजपचे हर्षवर्धन निवडणूक लढवत आहेत. याच चांदनी चौकात छोटे दुकान चालवणारे प्रथमेश दुआ म्हणाले, या भागातील व्यापार्‍यांना आपलेसे करण्यासाठी आशुतोषही आपल्या जातीचा आधार घेत आहेत. ते गुप्ता आहेत हे आतापर्यंत कोणालाच माहीत नव्हते. भाजप-कॉँग्रेसची वेगवेगळी दुकानदारी सुरू आहे. त्यांचे भागीदार लोकेंद्र गर्ग म्हणाले, सर्व उमेदवार स्थानिक असल्याचा दावा करतात. गाझियाबादचे रहिवासी केजरीवाल दिल्लीचे रहिवासी कसे? हे कोणी मला सांगावे.
विषय मेट्रोकडे वळला. लोकेंद्र म्हणाले, मेट्रो दिल्लीचा प्राण आहे. सर्वजण मेट्रोच्या माध्यमातून प्रचार करू इच्छितात. त्यांच्या बोलण्यावर एका वृद्ध नाराजी दर्शवत म्हणाला, त्यांच्या प्रचार आणि प्रसिद्धीमुळे अनेक वेळा मेट्रो बंद करावी लागली. लोकांना किती त्रास होतो ते माहीत नाही. यावर आरिफ म्हणाले, अरे, जनतेचा कोण विचार करतो? तरीही काळानुरूप बदला घेतलाच जातो. सूरज शर्मा चर्चेचा शेवट करण्याच्या मूडमध्ये येतात. ते म्हणाले, यूपीए जिंको की एनडीए; गरीब गरीबच, तर श्रीमंत हा श्रीमंतच राहील. नेते लोकांना खुळखुळा समजतात. या वातावरण दुष्यंत कुमार यांच्या ओळी आठवतात- ‘जिस तरह चाहो बजाओ इन सभा में, हम नहीं आदमी, हम झुनझुना हैं..’