आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्शन एक्सप्रेस : विस्तार है अपार...’मधून वंचित, अभावग्रस्त ईशान्येचे दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉर्थवेस्ट एक्स्प्रेसमधून-
विस्तार है अपार, प्रजा दोनों पार, करे हाहाकार नि:शब्द सदा..नैतिकता नष्ट हुई, मानवता, भ्रष्ट हुई , निर्लज्ज भाव से बहती हो क्यूं ? गंगा बहती हो क्यूं ?
भूपेन हजारिका यांच्या आवाजातील त्यांनीच लिहिलेले शब्द स्मार्टफोनमधून रेल्वेच्या झुकझुकसोबत काही तरी गूज करत आहे. गाण्यात भलेही गंगेची गोष्ट असली तरी आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीला पाहूनदेखील असाच प्रश्न निर्माण होतो. रेल्वेत बसून नकाशा वाचन करतेय. बिहारचे किशनगंज आणि पश्चिम बंगालचे दार्जिलिंग यांच्यात एक अशी जागा येते. जेथे भारत केवळ 8 किलोमीटर आकारात दिसून येतो. एकीकडे नेपाळ, दुसरीकडे बांगलादेशचा भाग आहे. या निमुळत्या भागातून निघाल्याबरोबर उत्तर-पूर्वेचा परिसर सुरू होतो. सिलिगुडी कॉरिडोरमुळे इशान्येकडील प्रांत उर्वरित देशाशी जोडला गेला आहे, असे म्हणावे लागते. निमुळत्या गल्लीत आल्यामुळे रेल्वेची गतीच नव्हे, तर विकासदेखील मंदावल्याचे दिसून आले. एकेरी रेल्वे मार्ग आणि त्यांचे आगमनही 10 तासांहून अधिक विलंबाने येथे पाहायला मिळते.

सेव्हन सिस्टर्समध्ये सिक्कीमला जोडले तर एकूण आठ राज्ये आणि 25 लोकसभा मतदारसंघ. यातील 12 मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहेत. भाजपकडे केवळ पाच मतदारसंघ आहेत. तेही केवळ आसामपुरतेच सीमित. भाजप असो किंवा काँग्रेस, चिंता 272 + चीच आहे. एक-एक जागा जोडली जात आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी असो की राहुल गांधी, यांच्या फेब्रुवारीपासून आतापर्यंत पाच-पाच सभा झाल्या आहेत. आसामवर अधिक भर आहे. आसाममध्ये जागा 14 आहेत. सुप्रीतम बॅनर्जी म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत तर सर्वकाही बदलल्यासारखे आहे. निवडणुकीच्या अगोदर बड्या नेत्यांनी हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ आहे. पूर्वी निवडणुकीच्या एक-दोन दिवस अगोदर एखादा नेता हजेरी लावत असे. अन्यथा तेदेखील फिरकत नसत. कोमल सिंघा राज्यशास्त्राच्या विद्यार्थिनी आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी नेत्यादेखील आहेत. त्या म्हणतात- यंदाच्या निवडणुकीत भाजपही प्रदेशात स्थान निर्माण करत आहे. रा.स्व. संघ प्रदीर्घ काळापासून त्या प्रयत्नात आहे आणि मोदीही. ममता बॅनर्जीदेखील या लढाईत आहेत. निडोच्या मृत्यूवर मोदी यांच्या प्रतिक्रियेला ईशान्येकडील जनतेने अतिशय सकारात्मकतेने घेतले आहे, असे प्रदीप कलिता यांना वाटते. कलिता दिल्लीतील एमएनसीमध्ये अभियंता आहेत. निवडणुकीत नेहमीच सुरक्षा हा ईशान्येकडील लोकांसाठी महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे; परंतु तेवढीच मोठी समस्या म्हणून रस्ता आणि विकासकामांचा अभाव हीदेखील आहे. गोगोई 13 वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. त्यांना अतिआत्मविश्वास वाटू लागल्याचे कलिता यांचे म्हणणे आहे.

तिनसुकियाचे राहणारे राजीव गोस्वामी देशातील उर्वरित राज्यातील नागरिकांवर प्रचंड नाराज दिसून आले. देशात ईशान्येकडील नागरिकांना भेदभावाची वागणूक मिळते हे मान्य केले पाहिजे. आमच्यासाठी तर हाच सर्वात मोठा मुद्दा आहे. राकेश सिंह 15 वर्षांपासून आसाममध्ये नोकरी करतात. ते म्हणाले, कॉरिडोर ओलांडल्यानंतर तुम्हाला वेगळेच जग पाहायला मिळेल. भौगोलिक पातळीवर ही 8 राज्ये देशाच्या एकूण 8 टक्के एवढीच आहेत; परंतु लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या केवळ 3.1 टक्के आहे. मात्र, लोकसभेच्या जागा 4.6 टक्के आहेत.
पुढील स्थानक कोलकाता...