आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभा उपसभापतिपदासाठी अाज चुरशीची निवडणूक; रिंगणात हरिवंश विरुद्ध हरिप्रसाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राज्यसभा उपसभापतिपदासाठी गुरुवारी मतदान हाेणार अाहे.  जदयूचे नेते हरिवंश नारायण सिंह हे एनडीएचे उमेदवार अाहेत. त्यांच्याविराेधात विराेधकांच्या अाघाडीने काँग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांना उमेदवारी दिली अाहे. त्यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. एनडीएत उमेदवारीवरुन कुरबुरी असल्याच्या चर्चा हाेत्या. मात्र, हरिवंश नारायण सिंह यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे मित्रपक्ष असलेल्या अकाली दल, शिवसेनेचे नेतेही उपस्थित हाेते, त्यामुळे या चर्चेवर अाता पडदा पडला अाहे. 


२४४ सदस्यसंख्या असलेल्या राज्यसभेत भाजपचे सर्वाधिक ७३ सदस्य अाहेत. त्याखालाेखाल काँग्रेसचे ५० सदस्य अाहेत. उपसभापती निवडणुकीत विजयासाठी १२३ मतांची अावश्यकता अाहे. भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी अाेडिशाचे मुख्यमंत्री तथा बिजदचे अध्यक्ष नवीन पटनायक यांच्याकडे पाठिंबा देण्याची मागणी केली.  

बातम्या आणखी आहेत...