आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक जाहीरनामे : अशा शपथा... अशी वचने.... असे संकल्प!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीप्ती राऊत 

नाशिक - निवडणुकीच्या प्रचारात आश्वासनांची गाजरे नेहमीचीच. त्यामुळेच ‘जाहीरनामा’ हा शब्द गेल्या काही निवडणुकांपासून हास्यास्पद ठरू लागलाय. जाहीरनामा ही फक्त औपचारिक पूर्तता असते आणि निवडून आल्यावर विसरून जायचे असते असा एक प्रघात पडला होता. कुणी याला ‘वचननामा’ म्हणू लागले, कुणी ‘दृष्टीपत्र’. निवडणूक झाल्यावर फाइलबंद झालेले जाहीरनामे पुन्हा उघडले जातात ते पाच वर्षांनी दुसरी निवडणूक आल्यावर त्यांचा लेखाजोखा करण्यासाठीच. 
यंदाची विधानसभा निवडणूक मात्र काहीशी वेगळी आहे. यावेळी प्रत्येक पक्षाने जाहीर केलेल्या घोषणापत्रात त्यांच्या पक्षाच्या भविष्यातील किमान ध्येयधोरणे आणि दिशा सविस्तर मांडल्या आहेत. मतदारांना त्यांचा निर्णय घेण्यास सहाय्यक ठरावे, निवडून दिलेल्या आमदारांना आणि त्यांच्या सत्ताधारी पक्षाला स्मरण करून देण्यासाठी संग्रही राहावे यासाठी या जाहीरनाम्यांमधील काही ठळक बाबींची ही एकत्रित मांडणी. 
 

विविध मुद्द्यांवर कुणाचे काय आश्वासन 
 

शेतकरी
> भाजप : दुष्काळमुक्ती, २४ तास सौरवीज पुरवठा
> शिवसेना : कर्जमुक्ती, १० वर्षे खतांचे स्थिर भाव
> महाआघाडी : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी
 
 

रोजगार 
> भाजप : राज्यात १ कोटी रोजगार निर्मिती करणार
> शिवसेना : भूमिपुत्रांना नोकऱ्यांसाठी ८० % आरक्षण देणार
> महाआघाडी : ८०%नोकऱ्या स्थानिकांना, १०० दिवस रोजगार
 

महिला
> भाजप : १ कोटी महिलांना बचत गटाद्वारे रोजगार देणार
> शिवसेना : बचत गटांना जिल्हा कॅन्टीन चालवण्यास देणार
> महाआघाडी : गृहोद्योगांच्या उत्पादनांना जीएसटीतून वगळणार
 

आरोग्य
> भाजप : संपूर्ण आरोग्यासाठी स्मार्ट कार्ड, मोतीबिंदू मुक्त राज्य
> शिवसेना : केवळ १ रुपयात २०० प्राथमिक आरोग्य चाचण्या
> महाआघाडी : आयुर्वेद-होमिओपॅथीचा आरोग्य सेवेत समावेश 
 

शिक्षण 
> भाजप : शिष्यवृत्तीसाठी एक खिडकी योजना लागू करणार
> शिवसेना : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी खास बससेवा - विद्यार्थी एक्स्प्रेस
> महाआघाडी : उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के दराने शैक्षणिक कर्ज
 

विशेष 
> भाजप : १ हजार अब्ज डॉलर्सवर अर्थव्यवस्था नेणार
> शिवसेना : १० रुपयांत भोजन, १५ लाखांची शिष्यवृत्ती देणार
> महाआघाडी : सुशिक्षित बेरोजगारांना ५ हजार मासिक भत्ता
 
 

बातम्या आणखी आहेत...