आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Election Officials Forgot To Delete Mock Pol Data And Deleted Real Votes In Shimla

चाचणीसाठी घेण्यात आलेली मते डिलीट करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी डिलीट केली खरी मते, निवडणूक आयोग करणार 20 अधिकाऱ्यांवर कारवाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिमला- हिमाचल प्रदेशामध्ये लोकसभा मतदानादरम्यान अजब प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मतदानादिवशी चाचणीसाठी घेतलेली मतं(मॉक पोल) डिलीट करण्यास निवडणूक अधिकारी विसरले. त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे हा प्रकार जेव्हा लक्षात आला तेव्हा चाचणीसाठी घेतलेली मते डिलीट करण्याऐवजी खरी मते डिलीट केल्याचं समोर आले आहे. रविवारी (19मे) रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी निवडणूक आयोग 20 अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे आहे. 


याबाबत हिमाचल प्रदेशचे मुख्य निवडणूक आयुक्त देवेश कुमार यांनी गंभीर दखल घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे. याप्रकरणी पाच पिठासीन अधिकारी आणि 15 निवडणूक अधिकारी निलंबीत होण्याची शक्यता आहे.


प्रत्यक्ष मतदानाच्या तासभरापूर्वी ईव्हीएम सुरळीत आहेत का, जे बटण दाबले त्याच उमेदवाराला मतदान जातं आहे का, शिवाय काही तांत्रिक बिघाड तर नाही ना, हे तपासण्यासाठी चाचणी मतदान घेतले जाते. जवळपास 50 मते ईव्हीएमवर करुन पाहिली जातात. यावेळी निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांचे प्रतिनिधीही हजर असतात. मतदान योग्य होत असल्याची खात्री पटल्यानंतर चाचणीसाठी घेतलेली मते ईव्हीएमवरुन डिलीट केली जातात.देशभरात कोणत्याही मतदानापूर्वी असेच मॉक पोलिंग केले जाते. हिमाचल प्रदेशातही ही प्रक्रिया केली, मात्र चाचणीसाठी घेतलेली मते डिलीट करण्यास अधिकारी विसरले आणि हा मोठा गोंधळ झाला.


या प्रकरणाबाबत देवेश कुमार म्हणाले, "हिमाचलमध्ये शेवटच्या टप्प्यात रविवारी मतदान झाले. यावेळी हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी, हमीरपूर आणि कांग्रा या लोकसभा मतदारसंघात 19 मे रोजी मतदान झाले, त्यादरम्यान हा प्रकार घडला. चाचणीसाठी घेतलेली मते डिलीट करण्यास 20 अधिकारी विसरले. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानात ही मते जमा झाली. ही चूक लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष झालेल्या मतदानातील मते डिलीट करुन आकड्याचे गणित जुळवण्याचा प्रयत्न केला."
 

बातम्या आणखी आहेत...