आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मोठा दिलासा, नोटरीसंदर्भातील आक्षेप फेटाळून लावला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता, पण आता मुख्यमंत्र्यांना दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक रिंगणात उतरलेले काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथ पत्रावर शिक्का मारणाऱ्या नोटरीची टर्म संपल्याचा दावा केला होता. त्यामुळे, त्यांनी मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची मागणी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली होती. पण, रिटर्नींग अधिकाऱ्याने त्यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचे सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ पत्रासाठी 3 तारखेला मुद्रांक विकत घेतले. शपथ पत्राची दस्त नोंदणी करणाऱ्या नोटरीचा शिक्काही या शपथपत्रावर आहे. पण, या शिक्क्यामध्ये असलेल्या नोटरीचा कार्यकाळ 2018 पर्यंतच असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे, काँग्रेसच्या आक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडून सील करण्यात आला आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...