आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Election Result 2019: Election In 5 States In 8 Months, BJP, Congress Lok Sabha Seats Performance Analysis

पुढील 8 महिन्यात या 5 राज्यात होणार विधनसभा निवडणुका, यातील 85 लोकसभेच्या जागांवर एनडीएने 73 तर यूपीएने 10 जिंकल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पुढील 8 महिन्यात 5 राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या राज्यात 85 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 73 जागांवर एनडीएने 73 आणि 10 जागांवर यूपीएने विजय मिळवला आहे. मागील वेळेस याच जागांवर एनडीएने 70 आणि यूपीएने 7 जागा जिंकल्या होत्या. 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुकांनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला फायदा झाला होता आणि या 5 राज्यांपैकी 4 राज्यात एनडीएने सत्ता स्थापन केली होती. नवीन सरकार बनल्यानंतर राम मंदिर निर्माण, कलम 370 संपवणे आणि 5 लाखांपर्यंतच्या इनकम टॅक्स फ्री होतील अशी आशा आहे.


तीन राज्यात सध्या एनडीएची सत्ता, येथे 72 पैकी एनडीएने 63 जागा जिंकल्या

 

 

राज्य

2019 मध्ये काय निकाल लागला?   

  मागील विधानसभेचे निकाल           

एनडीए

यूपीए

एनडीए

यूपीए

महाराष्ट्र (48)

415

भाजपा : 122

शिवसेना : 63

काँग्रेस : 42

राकांपा : 41

हरियाणा (10)

100

भाजपा : 47

काँग्रेस : 15

झारखंड (14)

122

भाजपा : 37

आजसू : 5

काँग्रेस : 7

जम्मू-कश्मीर (6)

33

भाजपा : 25

पीडीपी : 28

काँग्रेस : 12

नेकां : 15

दिल्ली (7)

70

भाजपा : 3

काँग्रेस : 0

 


तीन राज्यांवर असेल लक्ष 
1) महाराष्ट्र

2014 च्या लोकसभा निवडणुकीतील एनडीएच्या विजयानंतर भाजपा आणि शिवसेनेत मतभेद वाढले होते. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेने विधानसभा वेगवेगळ्या लढल्या होत्या. त्यात भाजपला 122 आणि शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर त्या दोन्ही पक्षात अस्थिरता होती, पण शेवटी लोकसभेला ते दोन्ही एकत्र आले.

 

2) दिल्ली
2013 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये त्रीशंकु परिस्थिती केली होती. 2013 मध्ये अरविंद केजरीवालने काँग्रेसच्या समर्थनार्थ सरकार स्थापन केली होती. पण अवघ्या 2 महिन्यानंतर 2014 मध्ये राजीनामा दिला होता. त्यानंतर 2015 मध्ये तिथे परत निवडणुका झाल्या. यावेळी केजरीवालच्या अध्यक्षेतखाली पक्षाने 70 पैकी 67 जागा जिंकल्या, तर भाजपला फक्त 3 जागेंवरच समाधान मानावे लागले.

 

3) जम्मू-कश्मीर
राज्यात 2014 ला विधानसभा निवडणूक झाली होती. यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. मार्च 2015 मध्ये भाजपाने पीडीपीला पाठिंबा देत सरकार स्थापन केली आणि मुफ्ती मोहम्मद सईद मुख्यमंत्री बनले. 2016 मध्ये त्यांच निधन झाले, त्यानंतर 88  दिवस मुख्यमंत्री पद रिक्त होते. त्यानंतर भाजपने महबूबा मुफ्तीला समर्थन दिले आणि त्या मुख्यमंत्री बनल्या. पण जून 2018 मध्ये भाजपने पीडीपीसोबतचू युती तोडली आणि महबूबा मुफ्तींना राजीनामा द्यावा लागला.