तुझी डिग्री काय, बोलतो काय, नावातच ‘विनोद’, अजित पवार यांची तावडेंवर टीका

मानसिक संतुलन ढासळल्याने पवार कुटुंबीयाकडून उद्धट वक्तव्य : शिवतारे

दिव्य मराठी

Apr 23,2019 09:59:00 AM IST

पुणे - विरोधक पवार साहेबांनी काय केले, असा प्रश्न करत आहेत. मात्र, ज्या रस्त्याने ते बारामतीत आले ते आघाडीच्या सरकारनेच बांधलेत. पवार साहेब म्हणजेच बारामती आणि बारामती म्हणजेच पवार साहेब, असे समीकरण म्हणून जग ओळखते आणि तावडे साहेबांवर टीका करतात? ‘तुझी डिग्री काय? तू बाेलताे काय? तुझ्या नावातच विनाेद अाहे. तू शिक्षणमंत्री अाहे ना, तिकडे जरा लक्ष दे की,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विनोद तावडेंवर टीका केली. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत अजित पवार बाेलत हाेते. दरम्यान, त्यांनी पुरंदरचे अामदार अाणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावरही चांगलेच ताेंडसुख घेतले. विजय शिवतारे अाता पाेपटासारखा बाेलायला लागलाय. तू यंदा कसा अामदार हाेताे तेच बघताे. अजित पवारने एकदा ठरवलं की एखाद्याला अामदार हाेऊ द्यायचं नाही तर ताे अामदार हाेतच नाही, असा इशाराच त्यांनी देऊन टाकला.


मानसिक संतुलन ढासळल्याने पवार कुटुंबीयाकडून उद्धट वक्तव्य : शिवतारे
अजित पवारांच्या टीकेला शिवतारे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, मी अामदार हाेणार की नाही हे ठरवणारे अजित पवार काेण अाहेत? बारामतीमध्ये जनता त्यांना अातापर्यंत साहेब-साहेब म्हणत हाेती. पण तीच जनता अाता त्यांच्याविराेधात जात असल्याने संपूर्ण पवार कुटुंबीयांचे मानसिक संतुलन ढासळल्याने ते उद्धटपणाचे वक्तव्य करत अाहेत. अशा प्रकारच्या धमक्यांना मी भीक घालत नाही. यंदाच्या निवडणुकीत पवारांची घमेंड जनताच घालवेल, असेही शिवतारे म्हणाले.

X