आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभूत 120 जागांवर लक्ष दिले, मोदींकडून 161 सभा करून घेतल्या, केंद्रांवर 90 लाख कार्यकर्त्यांना जुंपले, मिळवून दिला एेतिहासिक विजय; 2 कोटी 70 लाख कार्यकर्त्यांची फौज तयार केली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपच्या या अभूतपूर्व विजयामागे अमित शहा यांचे सूक्ष्म नव्हे नॅनो व्यवस्थापन आहे. ते त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कॉर्पोरेट व्यवस्थापनाच्या माध्यमातून तडीस नेले. शहा यांनी केंद्रांवर सुमारे ९० लाख सक्रिय कार्यकर्त्यांना कामाला लावले. सामाजिक समीकरणाच्या हिशेबाने प्रत्येक बूथवर २०-२० सदस्य (१.८ कोटी) जोडले. म्हणजेच २ कोटी ७० लाख कार्यकर्त्यांची फौज उभी केली. मोदींपेक्षा जास्त सभा शहा यांनी घेतल्या. मोदींनी १४४ सभा, तर शहा यांनी १६१ सभांमध्ये संबोधित केले. उमेदवारांच्या विरोधातील नाराजी २००४ प्रमाणे पक्षाला नुकसान पोहोचवू शकते, अशी शहा यांना शंका होती. ती दूर करण्यासाठी त्यांनी रणनीती बनवली. संपूर्ण निवडणूक प्रचार मोहिमेची अशी आखणी केली की, २८ मार्चपासून पीएमचा प्रचार सुरू होईल तेव्हापासून ७-८ एप्रिलपर्यंत त्याचे लाटेमध्ये रूपांतर केले जावे. तथापि, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशात नुकसानीची शक्यता वर्त‌वली जात होती. कारण मतदानाची टक्केवारी कमी किंवा २०१४ प्रमाणेच राहत होती. त्यानंतर संघ परिवारही पुढे आला. संघाने अप्रत्यक्षरीत्या “१०० टक्के मतदान, माझे मौल्यवान मत कुणाला? त्यांना, ज्यांनी...” हे अभियान राबवले व मोदी सरकारच्या योजनांचा उल्लेख केला. 


संघाचे असे राहिले काम
- संघाने पहिल्या-दुसऱ्या टप्प्यानंतर सक्रियता वाढवली. खासकरून उत्तर प्रदेश, बंगाल आणि ओडिशात प्रत्येक मतदारसंघात एक-एका प्रचारकाला सज्ज ठेवले. 
- थेट भाजपचा प्रचार करण्याऐवजी राष्ट्रवादाचा आधार घेतला आणि मोदी सरकारचे मुद्दे अप्रत्यक्षरीत्या मांडले.


बूथवर नॅनो मॅनेजमेंट
- शहा यांनी केंद्रांवर भर दिला आणि एक वर्षापूर्वीपासूनच याची तयारी केली होती. पक्षाने २२ कलमी अजेंडा बनवला होता. त्यात सामाजिक समीकरणासह मंदिर, एनजीओ, बचत गट, लाभार्थी, सहकारी संस्थांशी संबंधित लोकांना खासकरून जोडण्याचे काम केले.
- प्रत्येक मतदारसंघात १४ ते २१ सदस्यांची संचालन समिती बनवली आणि शहा यांनी सर्व राज्यांत जाऊन स्वत: याच्या बैठका घेतल्या.
- शहा यांनी सामाजिक समीकरणावर खास लक्ष ठेवत प्रत्येक बूथवर २० एससी, एसटी, ओबीसीचे सक्रिय सदस्य जोडले.
- प्रत्येक गावातील विजयी व पराभूत सरपंचांशी संपर्क साधून सदस्य बनवण्याचे काम केले.


पराभूत जागांवर लक्ष
- शहा यांनी पराभूत १२० लोकसभा जागा २५ क्लस्टरमध्ये विभागून मोठ्या नेत्यांना जबाबदारी देत काम केले. त्यापैकी ८० जागांवर भाजपने उमेदवार उभे केले. 
- भाजपने १०.३० वाजेपूर्वी उन्हाच्या आधी मतदान होईल याकडे लक्ष दिले. लोकसभेच्या दृष्टीने ४४२ प्रमुख आणि १० सहप्रमुख बनवले. 
- देशाच्या ४१२० पैकी २५६६ विधानसभा जागांवर पक्षाने पूर्णकालिक विस्तारक सज्ज ठेवले.
- प्रत्येक टप्प्यात मतदानापूर्वी सर्व बूथवरील कार्यकर्त्यांना शहांचा ऑडिओ संदेश दिला गेला. 
- मोदी यांनी १४४ सभा घेतल्या, तर शहा यांनी १६१ सभांना संबोधित केले. 


पश्चिम बंगालची रणनीती
- २०१४ च्या निवडणुकीत सुमारे ३३ जागा अशा होत्या की तिथे विजयी उमेदवाराचे मार्जिन तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारापेक्षा कमी होते. भाजप दोन ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिला, दोन जागा जिंकल्या.
- बंगालमध्ये भाजपने डिजिटल वाॅल पेंटिंगचा आधार घेतला आणि संपूर्ण परिसरात मोदींच्या चेहऱ्यासोबत  पोस्टर लावले. यामुळे टीएमसीचे कार्यकर्ते भडकले होते आणि हिंसाचार उसळला होता. 
- टीएमसीच्या अनेक मोठ्या नेत्यांवर डोळा ठेवत पक्षाने आपल्याकडे वळवले व भाजपच्या पारड्यात यंदा सर्वाधिक बंगाल व ओडिशाातून इतर पक्षांचे लोक आले. त्यांना भाजपने दोन्ही राज्यांत उमेदवारी दिली.