घराणेशाहीची परंपरा माेडीत काढण्याचे काम माेदी सरकारने केले - अमित शहा

विकासाची अनेक कामे भाजपने देशभरात केली असून सर्वात महत्वाचे काम त्यांनी राजकारणातील घराणेशाही माेडीत काढण्याचे केले

दिव्य मराठी

Apr 19,2019 07:00:00 PM IST

बारामती - बारामतीत मैत्रिपूर्ण लढत असल्याचे अफवा जाणीवपूर्वक उठवून अपप्रचार केला जात आहे. मात्र, काेणत्याही प्रकारची तडजाेड झालेली नसून बारामतीत भाजपच विजयी हाेर्इल. घाव करायचा तर मुंडक्यावर करायचा असताे त्यामुळे पूर्ण महराष्ट्रात चांगला मेसेज जार्इल. देशात सर्वत्र फिरताना प्रत्येक भागात ‘माेदी’, ‘माेदी’ आवाज एेकू येत आहे, कारण पंतप्रधान माेदी यांनी पाच वर्षात देशात परिवर्तन करण्याचे काम केले आहे. विकासाची अनेक कामे भाजपने देशभरात केली असून सर्वात महत्वाचे काम त्यांनी राजकारणातील घराणेशाही माेडीत काढण्याचे केले. जे घराणेशाही पुढे चालवतात ते देशाचा विकास करु शकत नाही. असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी व्यक्त केले.


भारतीय जनता पक्षाच्या बारामती लाेकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांचे प्रचारार्थ आयाेजित बारामती येथील सभेत ते बाेलत हाेते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते अाणि मंत्री महादेव जानकर,मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री राम शिंदे, विजय बापू शिवतारे, खासदार संजय काकडे, पुणे भाजप जिल्हाध्यक्ष अामदार संजय ऊर्फ बाळा भेगडे,अामदार माधुरी मिसाळ, आमदार बाबुराव पाचर्णे, आमदार राहुल कुल, आमदार शरद साेनवणे व्यासपीठावर उपस्थित हाेते.

X