Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Election2019 balasaheb thorat rally in aurangabad

'राफेल'चे कागदपत्र चोरीला गेले तेव्हा चौकीदार काय करत होता - माजी मंत्री बाळासाहेब थोरात

प्रतिनिधी | Update - Apr 16, 2019, 06:58 PM IST

'खासदार खैरे यांनी वीस वर्षात काय केले हा प्रश्न सुद्धा जनतेने विचारला पाहिजे'

  • Election2019 balasaheb thorat rally in aurangabad

    खंडाळा - राफेल घोटाळ्याचे कागद चोरीला गेले तेव्हा चौकीदार काय करत होता. हे सरकार बनवाबनवी करुण दिशाभुल करत असल्याचा आरोप राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, यांनी केला. ते औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील कॉग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड, यांच्या प्रचारार्थ सोमवार दि.१५ रोजी खंडाळा ता.वैजापूर येथे आयोजित सभेत बोलत होते.


    थोरात यांनी आपल्या शैलीत भाजप, शिवसेना,वर चौफेर टिका करताना जाती जातीत धर्मा धर्मात वाद लाऊन हे लोक आपली पोळी भाजत आहेत. प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता येतो हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेत दिलेला अधिकार आहेत.परंतु घटना बदल करण्याचा कट देखील हे सरकार रचत आहे, त्यांना घटना बदलुन निवडणूकाच बंद करायच्या आहेत. त्यामुळे आपण सावध होऊन भाजपला सत्तेपासून रोखले पाहिजे. खासदार खैरे यांनी वीस वर्षात काय केले हा प्रश्न सुद्धा जनतेने विचारला पाहिजे.

Trending