Home | National | Delhi | Election2019: Election commission back on work said by supreme court

कारवाई पाहता आयोगाचे अधिकार परतल्यासारखे वाटते : सरन्यायाधीश

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 17, 2019, 08:52 AM IST

निवडणूक आयोग म्हणाला होता- आम्ही शक्तिहीन; न्यायालयाने फटकारल्यावर योगी, मायावती, आझम आदींवर प्रचारबंदी केली

 • Election2019: Election commission back on work said by supreme court

  नवी दिल्ली- धर्म आणि जातीच्या नावावर चिथावणीखोर भाषण करणाऱ्या वाचाळ नेत्यांवर निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईवर सर्वोच्च न्यायलयाने मंगळवारी समाधान व्यक्त केले. सरन्यायाधीश रंजन गोगोई आयोगाला म्हणाले, तुमची कारवाई पाहून आयोगाला अधिकार परत मिळाले आहेत. आता कोणताही आदेश देण्याची गरज नाही. नेत्यांवर कारवाई न केल्याबद्दल न्यायालयाने सोमवारी आयोगाला फटकारले होते. यानंतर आयोगाने यूपीच्या ४ नेत्यांवर ४८ व ७२ तासांची प्रचारबंदी लादली होती. आयोगाने शक्तिहीन असल्याचे म्हटले होते.

  तरीही दुफळी माजवणारी भाषणे

  मुस्लिम एकजूट राहिल्यास काँग्रेस जिंकेल : सिद्धू ; गुन्हा दाखल
  काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी बिहारच्या कटिहारमध्ये जातीयवादी वक्तव्य केले. ते म्हणाले- ‘मी मुस्लिम बंधूंना सांगू इच्छितो की तुमचे प्राबल्य ६४% आहे. मुसलमान आमची पगडी आहे. तुम्ही एकत्र राहिल्यास काँग्रेसला कोणतीही शक्ती हरवू शकत नाही.’
  यावर निवडणूक आयोगाने अहवाल मागितला आहे. यासोबत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  मुस्लिम म्हणून बंदी : आझम यांचा मुलगा
  सप नेते आझम खान यांच्यावरील ७२ तासांच्या बंदीवर त्यांचा आमदार मुलगा अब्दुल्लांनी जातीय रंग दिला.ते म्हणाले- ‘वडिलांवरील बंदी मुस्लिम असल्यामुळे लागली. मोदींना खुश करण्यासाठी ते केले.’

  बूट स्वच्छ करण्याचे वक्तव्य; आझमना नोटीस
  अल्लाहला वाटल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून मायावतींचे बूट स्वच्छ केले जातील. अशा अनेक वादग्रस्त वक्तव्यांसाठी निवडणूक आयोगाने आझम यांना नोटीस जारी केली आहे.

Trending