Home | National | Other State | Election2019, Modi vs Rahul gandhi sabha in nation for election 2019

मोदींच्या ३५ सभांमध्ये एअर स्ट्राइकचा, राहुल यांच्या ३१ सभांत ‘न्याय’चा उल्लेख; दोन्ही नेत्यांनी प्रचारात विविध मुद्दे केले उपस्थित

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 13, 2019, 09:18 AM IST

मोदींनी फक्त एकदा राहुल-प्रियकांचे नाव घेतले, राहुल यांनी प्रत्येक सभेत घेतले मोदींचे नाव

 • Election2019, Modi vs Rahul gandhi sabha in nation for election 2019

  नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी दक्षिण भारताच्या दौऱ्यावर होते. राहुल यांनी तामिळनाडूत ४ सभा घेतल्या. त्यांनी २१ दिवसांत ४४ सभा घेतल्या. मोदींनी १३ दिवसांतच ४२ सभा घेतल्या. मोदींनी ३५ सभांत पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकचा, तर राहुल यांनी ३१ सभांत ‘न्याय’ या किमान उत्पन्न हमी योजनेचा उल्लेख केला. दुसरीकडे मोदींनी प्रत्येक सभेत काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप करत त्या पक्षाला पाकिस्तान समर्थक ठरवले. काँग्रेसला तुकड्यांची टोळी म्हटले.

  कमलनाथांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर छाप्यांचा रोज उल्लेख
  > मोदींनी गेल्या १० सभांत भोपाळमधील छाप्यांचा उल्लेख तुघलक रोड घोटाळा असा केला.

  > याउलट, सरकार घाबरलेले आहे, असे काँग्रेस म्हणत आहे. राहुल अद्याप त्यावर उघडपणे काहीही बोलले नाहीत.

  दोन्ही नेत्यांनी प्रचारात हे मुद्दे केले उपस्थित

  मोदी - शहजादा शब्द फक्त २ वेळा

  > मोदींनी चौकीदार, नामदार, कामदार, तुकड्या-तुकड्यांची टोळी यांसारख्या शब्दांचा जास्त उल्लेख केला. या वेळी ‘शहजादा’ शब्दाचा फक्त दोनदाच उल्लेख.
  > राहुल-प्रियंकांचे नाव फक्त एका सभेत केला. काँग्रेसमुक्त भारत आणि ‘सबका साथ-सबका विकास’ शब्द ऐकू आले नाहीत.

  राहुल - रफालचा उल्लेख फक्त ३ वेळा

  > राहुल यांनी सर्वात जास्त नरेंद्र मोदी, अनिल अंबानी, नीरव मोदी, मल्ल्या आणि चौकसीचे नाव घेतले. तीन सभांत त्यांनी दहशतवादी अझहर मसूदचाही उल्लेख केला.
  > रफालचा उल्लेख फक्त तीन सभांत. युवक, नोटबंदी, शेतकरी, जीएसटीचा उल्लेख आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त सभांत केला.

  दक्षिणेत मोदींनी ‘हिंदुस्तान के हीरो’चा, राहुल यांनी ‘नीट’चा उल्लेख केला

  प्रामाणिक चौकीदार चालेल की भ्रष्टाचारी?

  > देश एका सुरात बोलत आहे याचा मला आनंद आहे. जे प्रथमच मत देणार आहेत त्यांना मी विचारू इच्छितो की, राष्ट्राशी समझोता मंजूर आहे? प्रामाणिक चौकीदार चालेल की भ्रष्टाचारी नामदार हे आता निश्चित करायचे आहे. - नरेंद्र मोदी, महाराष्ट्रात

  आत्महत्या करणाऱ्या मुलीचा उल्लेख

  > वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. तामिळनाडूत अनिता नावाच्या मुलीने परीक्षेमुळे आत्महत्या केली होती हे मला माहीत आहे. केंद्राची अशी योजना लागू करायची की नाही हे आता राज्य सरकारच ठरवेल.’ - राहुल गांधी, तामिळनाडूत.

Trending