पाच वर्षांनी शिंदे पुन्हा म्हणाले; ही माझी शेवटची निवडणूक

पराभूत झाल्यानंतर शिंदे २०१९ मध्ये पुन्हा निवडणुकीला उभे राहिले.

दिव्य मराठी

Apr 17,2019 08:39:00 AM IST
सोलापूर-‘सोलापुरात चार वेळा भारतीय जनता पक्षाचा खासदार झाला. पण, त्यांनी विकासासाठी एक तरी ठोस प्रोजेक्ट आणला का? त्यांनी आणलेला प्रकल्प किंवा त्यासंदर्भातील बातम्या पाहण्यासाठी मी दुर्बीण लावून बसलोय, पण काहीच दिसले नाही,’ अशी भाजपवर टीका करतानाच काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी आपली ही शेवटची निवडणूक असल्याची घोषणा पुन्हा केली. विशेष म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उभे राहताना शिंदे यांनी असेच भावनिक आवाहन केले होते, मात्र तेव्हा पराभूत झाल्यानंतर शिंदे २०१९ मध्ये पुन्हा निवडणुकीला उभे राहिले.
X