Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Election2019 uddhav thackeray rally in amravati

आघाडी सरकारला घोटाळ्यांसाठी इंग्रजीचे आल्फाबेट्सही पुरले नाहीत, युती झाल्यामुळेच पवारांची निवडणुकीतून माघार : उद्धव ठाकरे

प्रतिनिधी | Update - Apr 16, 2019, 07:08 PM IST

महाआघाडीच्या पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण?

  • Election2019 uddhav thackeray rally in amravati

    अमरावती - आघाडी सरकारच्या काळात 'आदर्श'पासून एवढे भ्रष्टाचार झाले की आता मुले 'ए,बी,सी,डी',ही या घोटाळ्यांच्या नावांवरूनच शिकत आहेत, अशा विनोदी शैलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेहरू मैदानावर आज (दि.१६) दु. २.३० च्या सुमारास झालेल्या खा. आनंदराव अडसूळ यांच्या प्रचार सभेत आघाडी सरकारला भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून चांगलेच घेरले.


    आघाडी सरकारला घोटाळ्यांसाठी इंग्रजीचे अल्फाबेट्सही पुरले नाही, एवढी त्यांच्या भ्रष्टाचारांची यादी मोठी आहे. काँग्रेसने ५०-६० वर्षांच्या काळात काय केले ते सर्वांना माहित आहे. आता ते उलट्या बोंबा ठोकताहेत. आघाडी सरकारच्या कार्यकाळात दुष्काळात शिवसेनेने गरीब व बेघरांना आधार िदला. त्यावेळी सुमारे १२०० कुटुंबातील मुलींचा सामूहिक विवाह सोहळ्याद्वारे संसार थाटून िदला. शरद पवार िकंवा राहुल गांधी यांनी असे काहीच केले नाही. दुष्काळी चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांकडे आघाडी सरकारने पाठ फिरवली होती. आता ते दिखावा करीत आहेत. हे सर्वसामान्यांनाही कळते, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुखांनी विरोधकांना धारेवर धरले.


    महाआघाडीच्या पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण?
    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात देशभरातील ५६ पक्ष एकत्र आले आहेत. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राकाँ प्रमुख शरद पवार, बसपाच्या मायावती, तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू असे अनेक चेहरे असले तरी महाआघाडीच्या पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? असा प्रश्न साहजिकच देशातील जनतेला पडला असल्याचा टोमणाही उद्धव ठाकरे यांनी हाणला.

Trending