Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Election2019: Which MP do you want asked by Aditya thakre

जेलमध्ये जाणारा खासदार हवा की जनतेतील? : आदित्य ठाकरे

प्रतिनिधी | Update - Apr 16, 2019, 11:59 AM IST

‘राष्ट्रवादी’ पक्षाचा उल्लेख ‘भ्रष्टवादी’ असा केला.

 • Election2019: Which MP do you want asked by Aditya thakre

  नाशिक- ‘तुम्ही जेलमध्ये जाणारा खासदार निवडून देणार की जनतेतील?’ असा प्रश्न विचारत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ, त्यांचे काका छगन भुजबळ यांचे नाव न घेता टीका केली. तसेच ‘राष्ट्रवादी’ पक्षाचा उल्लेख ‘भ्रष्टवादी’ असा केला.

  नाशिकमधील शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. ‘छप्पन इंच छाती की छप्पन पक्षांची आघाडी? निवड तुम्ही करा’ असे आवाहनही त्यांनी उपस्थित मतदारांना केले. खान्देशी मतांची सर्वाधिक संख्या असलेल्या सिडको परिसरात आदित्य ठाकरे यांची प्रचारसभा झाली. ‘स्वत:च्या हातावर घड्याळ आणि राज्याचे बारा वाजवले,’ असा आरोप त्यांनी राष्ट्रवादीवर केला. आणि ‘तो’ पक्ष तर गायबच झाला, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी ‘मनसे’चे नाव न घेता लगावला. खान्देशची मुलुखमैदानी तोफ समजले जाणारे सहकारमंत्री गुलाबराव पाटील यांनी या वेळी भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली. राज्यमंत्री दादा भुसे या वेळी उपस्थित होते.


  नाशिकमधील पवननगर मैदानावर झालेल्या या सभेत शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर बसण्यासाठी मोठी गर्दी केली होती.


  गर्दीमुळे एका खुर्चीवर बसले दोन पदाधिकारी
  या कार्यक्रमाला नाशिकच्या तरुणाईने खूप मोठी गर्दी होती. त्यामुळे अनेक ठिकाणी एका खुर्चीवर दोन पदाधिकारी बसले होते. आदित्य ठाकरे यांनी व्यासपीठावर येतच त्यांच्यासाठी ठेवलेली ‘सिंहासनी’ खुर्ची बाजूला सारून त्यांनी साध्या खुर्चीवर बसणे पसंत केले. आदित्य यांच्या कृतीची चर्चा उपस्थित तरुण तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत होती. दरम्यान, आता निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.

  आदित्य म्हणाले
  काँग्रेस आणि महाEघाडी सत्तेवर आली तर काश्मीरमधून भारताचे नियंत्रण जाणार
  आघाडी सरकारचा सिंचन घोटाळा विसरू नका
  देशाला सक्षम नेतृत्व देण्यासाठी शिवसेनेला मत द्या
  पाकला ठोकण्याची क्षमता फक्त मोदींमध्येच आहे


Trending