Home | Maharashtra | Pune | Election2019:Congress declaration published by watchman

काँग्रेसलाही चौकीदाराची भुरळ, जाहीरनाम्याच्या प्रकाशनाचा दिला मान

प्रतिनिधी | Update - Apr 17, 2019, 08:34 AM IST

मोहन जोशी यांनी चौकीदाराकडून आपला जाहीरनामा प्रकाशित केला.

 • Election2019:Congress declaration published by watchman

  पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून ‘चौकीदार चोर है’चे नारे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापासून ते स्थानिक पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी दिले, मात्र त्याचा भाजपवर फारसा परिणाम झाला नाही. उलट ‘मैं भी चौकीदार’ असे बिरुद भाजपचा प्रत्येकच पदाधिकारी आता अभिमानाने आपल्या नावासमोर लावून वावरू लागला आहे. अगदी स्वत: मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देश-राज्यातील भाजपचे सर्व मंत्री स्वत:ला चौकीदार म्हणवून घेऊ लागले आहेत. सोशल मीडियावरही ‘चौकीदार’ शब्दाने धुमाकूळ घातला आहे.


  आता काँग्रेस पक्षालाही चौकीदाराविषयी आपुलकी वाटू लागल्याचा अनुभव मंगळवारी पुण्यात आला. पुणे मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी आपला जाहीरनामा प्रकाशित करण्याचा मान चक्क मोहंमद इस्माईल शेख नामक एका सुरक्षा रक्षकास (चौकीदार) दिला. महात्मा फुले वाड्यात हा कार्यक्रम झाला. सोशल मीडियावरही त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.


  मोदी हे तर अंबानी, विजय मल्ल्या, अदानींचे चौकीदार

  जाहीरनामा प्रकाशनावेळी चौकीदार
  शेख म्हणाले की, ‘सोशल मीडियावर ‘चौकीदार चोर है’ असा संदेश पसरत असल्याने वाईट वाटते. मोदी हे सामान्यांचे चौकीदार नसून अंबानी, विजय मल्ल्या, अदानी यांचे चौकीदार आहेत. खऱ्या चौकीदारासारखे १२ तास काम केल्यावर आमचे खरे काम लक्षात येईल. मागील सात वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असून आमच्या कामावरून जे राजकारण सुरू आहे ते पाहून वाईट वाटते. काँग्रेसने माझ्या हस्ते प्रकाशन केल्याचे मात्र समाधान आहे.’

Trending