Home | National | Delhi | Election2019;how to download voter slip online via mobile phone follow these steps

घर बसल्या आपल्या मोबाइल फोनवरून डाउनलोड करा आपली व्होटर स्लिप, जाणून घ्या प्रोसेस...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 23, 2019, 05:04 PM IST

19 मेपर्यंत लोकसभेच्या 543 जागांसाठी मतदान घेतले जाईल

 • Election2019;how to download voter slip online via mobile phone follow these steps

  गॅजेट डेस्क- भारतात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. 19 मेपर्यंत लोकसभेच्या 543 जागांसाठी मतदान घेतले जाईल. एकुण 7 टप्प्यात हे मतदान पार पडणार आहे, यातील चार टप्प्यातील मतदान अजून बाकी आहे. या मतदानाचे निकाल 23 मेला जाहीर होणार आहे. तर अशातच तुमच्या राज्यात किंवा मतदारसंघात मतदान पार पडले नसेल, आणि तुमचे नाव व्होटर लिस्टमध्ये आहे का नाही हे तुम्ही घरबसल्या पाहू शकता.


  व्होटर लिस्टमध्ये आपले नाव चेक करायचे असेल किंवा स्लिप डाउनलोड करायची असेल, या दोन्ही कामासाठी तुम्हाला राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल (Electoralsearch.in) वर जावे लागेल. येथून तुम्ही दोन प्रकाराने व्होटर लिस्ट मिळवू शकता. पहिल्या प्रकारात मागीतलेली सगळी माहिती मॅन्युअली भरून आणि दुसरा व्हाटर आयडीवरील EPIC नंबर टाकून.


  पहिला प्रकार

  >> जर तुमच्याकडे व्होटर आआयडी नंबर नसेल तर विवरणा द्वारे Search by Details टॅबवर क्लिक करा.

  >> त्यानंतर विचारलेली सगळी माहिती जसे नाव, वडील किंवा पतीचे नाव, वय, राज्य, जिल्हला आणि तालुक्याचे नाव भारावे लागेल.

  >> त्यानंतर खाली आपल्या नावाच्या मिळते-जुळते नाव दिसतील, त्यातील तुमच्या नावावर जाऊन व्हू डिटेल्स नावावर क्लिक करावे लागेल.

  >> क्लिक करताच तुम्हाला व्होटर लिस्टची माहिती मिळून जाईल, त्याला तुम्ही डाऊनलोड करून त्याची प्रिंट मारू शकता.

  दुसरा प्रकार

  >> जर तुमच्याकडे व्होटर आयडी नंबर असेल तर ‘ओळख पत्र क्रंमाकाद्वारे Search by EPIC No’वर क्लिक करा.


  >> येथे क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे नाव, राज्याचे नाव आणि बॉक्समध्ये असलेला Captcha Code भरावा लागेल.


  >> यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल, त्यावर तुम्हाला व्होटर लिस्ट दिसेल. त्याला तुम्ही डाऊनलोड करू शकता.

Trending