Home | National | Other State | Election2019:Lok Sabha Chunav 2019: BJP Leader Rajiv Pratap Rudy Eat panipuri During Campaign In Patna

प्रचारादरम्यान माजी केंद्रीय मंत्र्याला भुक लागली म्हणून गेले पानीपुरी गाड्यावर, म्हणाले- पानीपुरी खाऊन तृप्त झालो, पण जेव्हा विचारले एका दिवसांत किती कमवतोस, तर उत्तर ऐकून हैराण झाले...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 16, 2019, 02:56 PM IST

स्वत: फेसबूकवर शेअर केला व्हिडिओ, तुम्हीपण ऐका पानीपुरी वाल्याने काय उत्तर दिले.

 • Election2019:Lok Sabha Chunav 2019: BJP Leader Rajiv Pratap Rudy Eat panipuri During Campaign In Patna

  पटना(बिहार)- लोकसभा निवडणूक 2019 साठी पक्षा जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. या सर्व पळापळीत माजी केंद्रीय मंत्री आणि बीजेपी उमेदवार राजीव प्रताप रूडी यांचा पानीपुरी खातानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ अख्तियारपूर गावाचा आहे. प्रचारादरम्यान ते अख्तियारपूर चौकात थांबून एका पानीपुरीच्या गाड्यावरून पानीपुरी खाल्ली. पानीपुरी खाऊन ते पानीपुरीवाल्या व्यक्तीला म्हणाले-तृप्त झालो. रोज किती कमावतोस ?


  उत्तर ऐकून हैराण झाले रूडी
  पानीपुरी विकणाऱ्या रंजीतने सांगितले- आधी तो पटनामध्ये पानीपुरी विकत होतो, आता या गावाजवळच गाडा लावतो. चांगली कमाई होत आहे, रोज 2500 ते 2700 रूपये कमावतो. त्याची एका दिवसाची कमाई ऐकून तेथे उपस्थित लोकांना धक्का बसला. पानीपुरी खाणे झाल्यावर रूडी यांनी किती पैसे झाले ते विचारले, त्यावर त्याने पैसे घेण्यास नकार दिला. पण रूडी म्हणाले- पैसे दिल्याशिवाय मी येथून जाणार नाही. हा व्हिडिओ रूडी यांनी आपल्या फेसबूक अकाउंटवर शेअर केला आहे.


  सारण लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आहेत रूडी
  राजीव प्रताप रूडी सारणचे खासदार आणि मोदी सरकारमध्ये कौशल विकास मंत्री पदावर राहीले आहेत. यावेळसही त्यांनाच सारणामधून तिकीट मिळाले आहे.

Trending