Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Election2019:Narendra Modi sabha from Akluj

अकलूजमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा, काँग्रेस आणि शरद पवारांवर सोडले टीकास्त्र

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 17, 2019, 12:47 PM IST

कोणत्याही परिस्थितीत भाजपने माढा जिंकण्याचा चंग बांधला आहे

 • Election2019:Narendra Modi sabha from Akluj

  सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरातील अकलूजमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेत मोदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. यावेळी माढ्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी याधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि भाजप-शिवसेना युतीच्या बारामतीतील उमेदवार कांचन कुलही उपस्थित आहेत.


  माढ्याच्या जागेवरुन गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय हालचाली झाल्या. माढ्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटलांची तिकीट कापून, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लढण्याचे ठरवले. मात्र, त्यानंतर एकाच घरातील तिघे निवडणुकीच्या रिंगणात नको, असे कारण देत शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली. पण, त्यांच्या माघारीमागे मोहित पाटलांची नाराजी असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. त्यानंतर काहीच दिवसात विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता विजयसिंह मोहिते पाटील हेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

  शरद पवारांवर केला हल्लाबोल
  ''देशाला मजबूत नेता हवा आहे का मजबुर नेता'' असा सवाल मोदींनी मतदारांना विचार. त्यासोबत त्यांनी मतदारांना भावनि आवाहनदेखील केले. ''शिवराय, माता भवानी, विठोबा, तुकोबाच्या भुमित मला आशीर्वाद द्या.'' काँग्रेस आघाडी कधीच देशाला मजबुत करू शकत नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्यासोबतच त्यांनी शरद पवारांवरही टिका केली. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी मोदींच्या कुटुंबार टीका केली होती, त्यावर मोदींनी त्याला उत्तर दिले आहे. मोदी म्हणाले, शरद पवारांना माझ्या कुटुंबाची चिंता करण्याची गरज नाहीये. शाहु, फुले , आंबेडकर, सावरकर यांच्या कुटुंबांनी खूप मोठे बलिदान देशासाठी दिले आहे आणि मी त्यांच्या कुटुंबातून प्रेरणा घेतली आहे. तसेच हा संपूर्ण देश माझे कुटुंब असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. पवारांनी पराभवाच्या भीतीने माढ्यातून पळ काढला असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

  शरद पवारांवर केला हल्लाबोल
  ''देशाला मजबूत नेता हवा आहे का मजबुर नेता'' असा सवाल मोदींनी मतदारांना विचार. त्यासोबत त्यांनी मतदारांना भावनि आवाहनदेखील केले. ''शिवराय, माता भवानी, विठोबा, तुकोबाच्या भुमित मला आशीर्वाद द्या.'' काँग्रेस आघाडी कधीच देशाला मजबुत करू शकत नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्यासोबतच त्यांनी शरद पवारांवरही टिका केली. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी मोदींच्या कुटुंबार टीका केली होती, त्यावर मोदींनी त्याला उत्तर दिले आहे. मोदी म्हणाले, शरद पवारांना माझ्या कुटुंबाची चिंता करण्याची गरज नाहीये. शाहु, फुले , आंबेडकर, सावरकर यांच्या कुटुंबांनी खूप मोठे बलिदान देशासाठी दिले आहे आणि मी त्यांच्या कुटुंबातून प्रेरणा घेतली आहे. तसेच हा संपूर्ण देश माझे कुटुंब असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.


  मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
  थकीत कर्जदारांकडून पैसे वसुल केले जातील
  पाच वर्षात सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही
  उरी, पुलवामा हल्ल्यानंतर त्यांच्या आम्ही घरात घूसून त्यांना मारले
  विरोधकांकडे बोलण्यासाठी काहीच नाहीये त्यामुळे फक्त मोदी हटवा असा नारा ते देत आहेत
  काँग्रेस आणि आघाडी कधीच भारताला मजबुत करू शकणार नाही

Trending