Home | National | Delhi | Election2019;PM Narendra Modi Interview by Akshay Kumar

अक्षय कुमारने घेतली नरेंद्र मोदींची मुलाखत: पंतप्रधानांचा खुलासा- मला कुर्ते आणि मिठाई पाठवतात ममता..

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 24, 2019, 02:46 PM IST

मोदी म्हणाले- मला राग येतो, पण मी स्वत:वर ताबा ठेवतो

 • Election2019;PM Narendra Modi Interview by Akshay Kumar

  नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या मध्येच अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निवडणुकीशी संबंध नसलेल्या इंटरव्ह्यू घेतला आहे. याला न्यूज एजन्सी एएनआयने पब्लिश केले आहे. यात अक्षयने पंतप्रधानांना विचारले- विरोधी पक्षांबाबतचे तुमचे मत जे टीव्हीवर दिसते तसेच प्रत्यक्षात आहे का? यावर मोदी म्हणाले- आम्ही वर्षांतून एक-दोन वेळेला सोबत जेवणदेखील करतो. मी बोलेल तर निवडणुकीत नुकसान होईल पण तरीदेखील सांगतो की, दिदी मला दर वर्षी त्यांनी पसंत केलेले कुर्ते आणि बंगाली मिठाई पाठवतात. अक्षयने हा इंटरव्ह्यू दिल्लीमधल्या लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान कार्यालयात घेतला.


  त्याआधी अक्षयने सोमवारी ट्वीट केले होते की, तो अनोळखी क्षेत्रात उतरणार आहे, आणि दुसऱ्याच दिवशी त्याने याचा खुलासा केला होता. मंगळवारी त्याने ट्वीटमध्ये सांगितल की तो बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मोकळेपणाने आणि राजकारणा व्यतिरीक्त बोलणे करणार आहेत. अक्षयने ट्वीटमध्ये लिहीले , ‘‘जेव्हा संपूर्ण देश निवडणूक आणि राजकारणाविषयी बोलत आहे, हा एक वेगळ्याप्रकारचा इंटरव्ह्यू असेल. आपल्या पंतप्रधानांसोबतचे बोलने पूर्णपणे राजकारव्यतिरीक्त असेल.’’


  त्याला उत्तर देताना मोदींनी ट्वीट केले, ‘‘प्रिय अक्षय कुमार, तुमच्यासोबत गप्पा मारून चांगले वाटले. आशा करतो की, आपले बोलने ऐकून लोकांना चांगले वाटेल.''

  अक्षयचे प्रश्न, मोदींचे उत्तर

  अक्षय- एकदा मी माझ्या ड्रायव्हरच्या मुलीला विचारले- मोदींजी भेटले तर काय करशील? ती म्हणाली- आपले पंतप्रधां आंबा खातात का, खातात तर कसे, कापून का तसेच?

  मोदी- आंबा खातो, मला तो खूप आवडतो. गुजरातमध्ये आंब्याच्या रसाची पंरपरा आहे. लहान होतो तेव्हा आमचे कुटुंब गरीब होते,त्यामुळे विकत आंबे घेता येत नसायचे. तेव्हा मी झाडाचे तोडून खात होतो.

  अक्षय- पंतप्रधान होण्याचा कधी विचार केला होता का?
  मोदी- मी कधीच विचार केला नव्हता की, मी पंतप्रधान बनेल. माझे जे बॅकग्राउंड आहे त्यानुसार जर मला एखादी नोकरी मिळाली असती तर माझ्या आईने परिसरात गुळ वाटला असता. मला आश्चर्य वाटते की, देशातील लोक माझ्यावर इतके प्रेम कसकाय करतात.

  अक्षय- तुम्हाला संन्यासी व्हायचे होते? सैन्यात जायचे होते?
  मोदी- 1962 ला युद्ध झाले. स्टेशनवर पाहीले की, जे लोक सैन्यात जात आहेत, त्यांना खूप मान सन्मान मिळत आहे. मलापण सैन्यात जायते होते. तेव्हा वाटले की, या क्षेत्रात राहून देशासाठी काहीतरी करू शकतो.

  अक्षय- आमच्या पंतप्रधानांना राग येतो का? जर येतो तर काय करतात?
  मोदी- राग येणे हा स्वभाव आहे. हा स्वभाव सर्वात असतो. तुम्हाला हा स्वभान देवाने दिला आहे, तुम्हाला ठरवायचे आहे. मी इतके दिवस मुख्यमंत्री होतो, पंतप्रधान होतो पण आतापर्यंत कोणावरच राग करण्याची वेळ आलीच नाही. मी लोकांकडून शिकतो आणि शिकवतो. माझ्या अंगात राग येतो पण मी स्वत:वर ताबा ठेवतो.

  अक्षय- तुम्हाला आईसोबत राहायचे नाहीये का?
  मोदी- मी पंतप्रधान म्हणून घरातून निघतो तेव्हा वाटते की, सगळे माझ्या सोबत आहेत. पण मी खूप कमी वयात ते सगळं सोडून दिलं आहे. मी घर सोडून निघालो त्यामुळे माझी ट्रेनिंग तशीच झाली आहे. पण तरिही मी आईला बोलावले होते. काही दिवस त्यांच्यासोबत घालवले. पण आई म्हणते, का आपली वेळ वाया घालवत आहेस. आई सोबत राहत होती, पण मी माझ्या शेड्यूलमध्येच व्यस्त होतो.


  अक्षय- जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता, तेव्हा मी तुम्हाला भेटलो होतो आणि एक दोन जोक्स ऐकवले होते. आता पण तुमचा तसाच ह्यूमर आहे का? तुमच्या स्वभाव खूप स्ट्रिक्ट वाटतो.
  मोदी- माझा हा स्वभाव चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. ऑफिसला जातो, स्वत:काम करतो, तेव्हा लोकांना वाटते की, हे काम करत आहेत तर आपणदेखील केले पाहीजे. कधी-कधी रात्री बेरात्री फोन करून एखादे काम झाले का नाही ते विचारतो. मी कामाच्या वेळेस काम करतो, इकडच्या तिकडच्या गप्पा मारत नाही. माझ्या मिटींगमध्यो कोणीच मोबाईल वापरत नाही, माझा फोनदेखील नसतो.

  अक्षय- असे ऐकण्यात आले आहे की, तुम्ही तुमच्या कमाईतले 21 लाख रूपये गरीब मुलींना दान केले आहेत?

  मोदी- मी माझ्या सेक्रेटरीच्या मुलीच्या मदतीसाठी गुजरात सरकारला 21 लाख रूपये दिले.

  अक्षय- तुम्हाला अलादीनच्या चिराग मिळाला तर काय कराल?
  मोदी- मी तर म्हणेल की, जितके समाजशास्त्री आहे त्यांनी मुलांना अलादिनची गोष्ट ऐकवणे बंद केले पाहीजे. मुलांना मेहनत करायला शिकवा.

Trending