Home | Maharashtra | Mumbai | Election2019:Raj Thakre got per,ission fpr Sabha in Mumbai

राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेला अखेर परवानगी मिळाली; सभेचे ठिकाण, तारीख आणि वेळ ठरली...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 21, 2019, 06:53 PM IST

सभेला परवानगी मिळण्यात शिवसेनेने खोडा घातल्याचीही चर्चा होती

  • Election2019:Raj Thakre got per,ission fpr Sabha in Mumbai

    मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुंबईतील पहिल्या सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. पण, ही सभा 24 एप्रिलऐवजी 23 एप्रिलला मुंबईतील शिवडीतील काळाचौकी मैदानात होणार आहे. पहिल्यांदा राज ठाकरेंच्या या सभेला परवानगी नाकारण्यात आल्याचे वृत्त आले होते. त्यामुळे मनसेची सभा होणार की नाही, याबाबत कमालिची उत्सुकता लागली होती.


    राज ठाकरे यांच्या मुंबईसह पनवेल आणि नाशिक येथे एकूण 4 सभा होणार आहेत. त्यापैकी पहिल्या 2 सभा 23 आणि 24 एप्रिलला मुंबईत, तिसरी सभा 25 एप्रिलला पनवेलमध्ये आणि शेवटची सभा 26 एप्रिलला नाशिकमध्ये होणार आहे.


    दरम्यान, सभेला परवानगी मिळण्यात शिवसेनेने खोडा घातल्याचीही चर्चा होती. निवडणूक सभांना परवानगी देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी योजनेअंतर्गत राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. यावेळी मनसे निवडणूक लढवत नसल्याचेही कारण देण्यात आले होते. त्यानंतर या सभेसाठी महानगरपालिकेकडून परवानगी घेण्यास सांगितले. पण, परवानगी देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप मनसेने केला होता.


    राज ठाकरे यांच्या सभांना महाराष्ट्रातून मिळणार भरघोस प्रतिसाद आणि त्याची देशभर सुरु असलेली चर्चा यामुळे शिवसेना धास्तावली असल्याचीही चर्चा आहे. त्याचा परिणाम म्हणूनच राज ठाकरेंच्या सभेला आडमार्गांनी विरोध होत आहे, असा आरोप शिवसेनेवर होत आहे.

Trending