आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन- गुरुवारी ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. मँचेस्टर आणि दक्षिण आशियाई लोक जिथे मोठ्या प्रमाणात राहतात ते ब्रॅडफर्ड शहर लेबर पार्टीचा बालेकिल्ला आहे. येथे कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी फक्त नावापुरतीच आहे. ब्रिटनची एकूण लोकसंख्या सहा कोटी आहे. यामध्ये २.५ टक्के भारतीय आहेत. यामुळे निवडणुकीत भारतीयांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.
नुकतेच कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे भारतवंशीय उमेदवार व माजी खासदार शैलेश वारा यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. यात हिंदी गाणे ऐकायला येत आहे. जॉन्सन यांना विजयी करण्याची विनंती आणि लेबर पार्टीचे उमेदवार जेरेमी कॉर्बिन यांच्याविरोधातील गोष्टी ऐकू येत आहेत. व्हिडिओमध्ये जॉन्सन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे छायाचित्र दाखवण्यात येत आहे.
‘जागो...जागो...जागो, चुनाव फिर से आया है”, बोरिस को जिताना है, देश को आज बचाना है, कुछ करते हमें दिखाना है,’ असे या गाण्यांचे बोल आहेत. स्थानिक कलाकारांना रोजगार मिळावा यासाठी, हा व्हिडिओ लोकल स्टुडिओमध्ये बनवला आहे, काश्मीर मुद्द्याबाबत लेबर पार्टीवर नाराजी : ब्रॅडफर्डचे नागरिक राकेश शर्मा, इतर भारतीयांप्रमाणेच लेबर पार्टीवर नाराज आहेत. पक्षाने काश्मीरमध्ये मानवाधिकार लागू करण्याचा प्रस्ताव पारित केला होता. पंजाबमधून आलेल्या मुकेश चावला कॉर्बिन यांनी कलम ३७० रद्द करण्याला विरोध केला होता.
जॉन्सन यांनी मात्र काश्मीरचा प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा असून, इतरांनी यात हस्तक्षेप करू, नये असे म्हटले होते. या विधानामुळे अनेक नागरिक त्यांचे समर्थन करत आहेत. गेल्या आठवड्यात जॉन्सन यांनी स्वामीनारायण मंदिराला भेट दिल्याने अनेक भारतीय त्यांच्या बाजूने आहेत. तर लेबर पार्टीने भारतीयांना आकर्षित करण्यासाठी सत्तेत आल्यावर जालियनवाला बाग हत्याकांडासंदर्भात माफी मागणार असल्याचे आश्वासन दिले. अभ्यासक्रमात ब्रिटिश अत्याचारांचा समावेश करण्यात येईल.
अमेरिका आणि इस्रायल निवडणुकीतही भारताची अशा प्रकारे चर्चा झाली होती
इतर देशांच्या निवडणुकीत भारताविषयी चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी इस्रायल निवडणुकीत नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक राष्ट्राध्यक्षांच्या छायाचित्रांचा वापर केला होता. अमेरिकेतील निवडणुकीच्या वेळेस डोनाल्ड ट्रम्प “आय लव्ह हिंदू’ म्हणतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.