आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Electric Cars Run Triple Distances At The Same Cost As Compared To Petrol diesels

पेट्राेल-डिझेलच्या तुलनेत समान खर्चात इलेक्ट्रिक कार कापते तिप्पट अंतर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाश्चिमात्य देशांत इलेक्ट्रिक कारचा वापर वाढत आहे. या कार पर्यावरणासाठी डिझेल-पेट्राेलने चालवणाऱ्या कारच्या तुलनेत जास्त अनुकूल मानल्या जातात. आता ब्रिटनमध्ये नव्या संशाेधनानुसार इलेक्ट्रिक कार इंधनवर हाेणाऱ्या खर्च प्रकरणातही सामान्य कार्सच्या तुलनेत जास्त परवडणाऱ्या आहेत. ब्रिटनची कार रिव्ह्यू वेबसाइट पार्कर्सने तेथे वापऱ्या जाणाऱ्या अनेक इलेक्ट्रिक आणि पेट्राेल-डिझेल कार्सच्या प्रती पाैंड गाठल्या जाणाऱ्या अंतरावर संशाेधन केले आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक कार दर एका पाैंडच्या खर्चावर सामान्य कारच्या तुलनेत तिप्पट जास्त अंतर कापतात. या गणनेत इलेक्ट्रिक कारला चार्ज करण्यासाठी येणाऱ्या वीज खर्चाची तुलना पेट्राेल-डिझेलवर हाेणाऱ्या खर्चाशी करण्यात आली. अभ्यासात आढळले की, २०१९ मध्ये लाँच इलेक्ट्रिक कार किया ई-नायट्राे आणि २०१२ मध्ये बाजारात उपलब्ध इलेक्ट्रिक कार रेनाे जाेए प्रती पाैंड खर्चावर ५३.२६ किलाेमीटर अंतर कापतात. दुसरीकडे, टेस्ला माॅडेल-३ कार प्रत्येक पाैंडाच्या खर्चावर ५१.९८ किमी चालते. त्यांच्या तुलनेत तिथे प्रचलित एनर्जी एफिशिएंट कार प्रती पाैंड खर्चावर खूप कमी अंतर कापतात. हाेंडा सिव्हिक सलून आणि फाेर्ड फाेकस प्रती पाैंड १७.३८ किमी चालते. पार्कर्सकडून जारी निवेदनानुसार, ब्रिटनमध्ये एक कारमालक सरासरी ११,५०६ किमी गाडी ड्राइव्ह करतो. समजा ताे इलेक्ट्रिक कारचा मालक असेल तर १९,२९९ रुपये खर्च हाेतील. मात्र, ताे पेट्राेल-डिझेलने चालणारी कार चालवत असेल तर त्याचे ६८,५९२ रु. खर्च हाेतील. सध्या जगात इलेक्ट्रिक कारच्या किमती पेट्राेल-डिझेलने चालणाऱ्या कारच्या तुलनेत जास्त आहे.

घरात चार्ज केल्यावर येणाऱ्या बिलाची गणना
पार्कर्सने इलेक्ट्रिक कार्सना घरी चार्ज केल्यावर येणाऱ्या वीज बिलाचा वापर केला. वेबसाइटच्या म्हणण्यानुसार, बाहेरच्या चार्जिंग स्टेशनवर चार्जिंगच्या दरात खूप अंतर आहे. त्यामुळे घरातील विजेच्या आधारावर ही गणना केली आहे. ब्रिटनमध्ये २०१९ मध्ये इलेक्ट्रिक कार्सची विक्री पहिल्या ९ महिन्यांत १२२% पर्यंत वाढली.
 

बातम्या आणखी आहेत...