आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावल- तालुक्यातील अंजाळे येथे विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अंजाळे येथे घडली.
मिळालेली माहिती अशी की, गावातील ट्रान्सफॉर्मरची फ्यूज कोणीतरी काढून टाकले होते. फ्यूज टाकण्यास उशिरा का आला, असा जाब एकाने वायरमनला विचारत त्याला मारहाण केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दत्तू कृष्णा कोळी याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूषण भोजू भालेराव (वायरमन, वीज उपकेंद्र राजोरा कक्ष) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ते राजोरा येथे असताना त्यांना अंजाळे गावातून फोन आला. विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. भूषण भालेराव सकाळी साडेआठ वाजता अंजाळे येथे पोहोचले. बस स्थानकाजवळ असलेल्या रोहित्रजवळ पाहणी केली असता तेथील रोहित्रामधील सहा फ्यूज अज्ञात व्यक्तीने काढल्याचे वायरमनच्या यांच्या निदर्शनास आले. गावातील रहिवासी दत्तू कृष्णा कोळी याने भालेराव यांना इतक्या उशिरा का आला लवकर वीजपुरवठा सुरू कर, असा दम भरला. एवढेच नाही तर शिवीगाळ करून धक्काबुक्की करीत त्याला मारहाण केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर, हवालदार संजय तायडे करीत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.