Home | Business | Auto | electric-motorcycle

इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत वाढ

team divya marathi | Update - May 24, 2011, 06:38 PM IST

शात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या अक्षय उर्जा मंत्रालयाने सुरु केलेल्या अनुदानामुळे अशा वाहनांची विक्री वाढली आहे.

  • electric-motorcycle

    इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत वाढ

    देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या अक्षय उर्जा मंत्रालयाने सुरु केलेल्या अनुदानामुळे अशा वाहनांची विक्री वाढली आहे. डिसेंबर 2010 पासून ही योजना सुरु केली आहे. चालू वित्तिय वर्षामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या एक्स फॅक्टरी किंमतीवर सरकार 20 टक्के अनुदान देणार आहे. त्यामुळे या गाड्यांच्या किंमती कमी होण्यास मदत मिळत आहे. कमी वेगाने चालणा-या गाड्यांना 4000 तर जास्त गती असलेल्या गाड्यांना 5000 रुपयांपर्यंत सुट देण्यात येते.
    किंमत कमी झाल्यामुळे साहजिकच या गाड्यांकडे ग्राहकांचा कल वाढतो. हिरो इलेक्ट्रिकचे सीईओ सोहिंद्र गिल यांच्यानुसार गेल्या वित्तिय वर्षामध्ये 80,000 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री होण्याचा अंदाज आहे. अनुदान योजना सुरु झाल्यापासून विक्रीत सुमारे 20 टक्के वाढ झाली आहे. देशात सध्या 22 कंपन्या इलेक्ट्रिक दुचाकीची निर्मिती करतात. तर अनुदान योजना जाहिर झाल्यानंतर 7 कंपन्यांनी या क्षेत्रात उतरण्यासाठी अर्ज केला आहे.

Trending