आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांनी मागितला दोन वर्षांसाठी 20,000 कोटींचा इन्सेंटिव्ह 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- इलेक्ट्रिक वाहन बनवणाऱ्या कंपन्यांची संस्था एसएमईव्हीने या गाड्यांची विक्री वाढवण्यासाठी दोन वर्षे २० हजार कोटी रुपयांचा इन्सेंटिव्ह मागितला आहे. हे पैसे जमा करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल-डिझेलवरील गाड्यांवर हरित सेस लावण्याचा सल्लाही दिला आहे. सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्सने (एसएमईव्ही) हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी फेम सबसिडीला सहा वर्षांसाठी लागू करण्याचीही मागणी केली आहे. 

 

संस्थेचे महानिदेशक सोहिंदर गिल यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी दीर्घकालीन धोरणाची आवश्यकता आहे. २०३० पर्यंत ३० टक्के इलेक्ट्रिक वाहनांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्राहकांना इन्सेंटिव्ह देण्याची गरज आहे. देशातील १० सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये सरकार कमीत कमी १० लाख इलेक्ट्रिक वाहनांचे उद्दिष्ट ठेवेल, अशी संस्थेची अपेक्षा आहे.

 

इलेक्ट्रिक वाहन बनवणारी कंपनी लोहिया ऑटो इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष लोहिया यांनी सांगितले की, फेम योजना कमीत कमी १० वर्षांसाठी लागू करायला हवी. त्यांनी सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांवर इनपुट टॅक्स क्रेडिटसह कमाल ५ टक्के जीएसटी लावण्याचाही सल्ला दिला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...