आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार, जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जीएसटी परिषदेने इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटीचे दर १२ टक्क्यांवरून ५ टक्के असे घटवले आहेत. त्याचबरोबर त्याच्या चार्जरवर आता १८ टक्क्यांएेवजी ५ टक्के कर आकारण्यात येईल. जीएसटी परिषदेच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. नवे दर एक ऑगस्टपासून लागू होतील. यामुळे देशातील इलेक्ट्रिक वाहने सध्यापेक्षा स्वस्त मिळतील. लोकांना पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 


 वित्त मंत्रालयाने सांगितले की, १२ किंवा त्याहून जास्त प्रवासी क्षमतेच्या बस भाड्याने घेतल्यास स्थानिक संस्थांचा जीएसटी माफ होईल. इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यांनी जीएसटी परिषदेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. एसएमईव्ही संचालक जनरल सोहिंदर गिल म्हणाले की,आता बॅटरीवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून कमी व्हावा.

 

दोन निर्णय व्यापाऱ्यांसाठी 
> विशिष्ट सेवा पुरवठादारांकडून कर भरणा पर्यायांचा लाभ घेण्यासाठी फॉर्म जीएसटी सीएमपी - ०२ मध्ये माहिती फाइल करण्यासाठी मुदत ३१ जुलैवरून ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. 
> कम्पोझिशन स्कीमअंतर्गत करदात्यांद्वारे जून तिमाहीसाठी फॉर्म जीएसटी सीएमपी-०८ मध्ये सेल्फ असेस्ड कराची माहिती फाइल करण्याची मुदतदेखील ३१ जुलैवरून ३१ ऑगस्ट करण्यात आली आहे.