आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - वीजपुरवठ्याचा बुधवारी सकाळी अचानक दाब वाढल्याने इंडिया गॅरेज परिसरातील टिव्ही, रुग्णालयातील मॉनिटर, इन्व्हर्टर जळून सुमारे दाेन लाख रुपयांचे नुकसान झाले. रुग्णांना लावलेले मॉनिटरमधून धूर निघाल्याने रुग्णालयात एकदम धावपळ उडाली हाेती. याबाबत नागरिकांनी महावितरणच्या अभियंत्यांकडे गुरुवारी तक्रार केली अाहे.
बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास अचानक विजेचा दाब वाढला. त्यामुळे चंद्रशेखर पंडित कुळकर्णी यांच्या घरातील रंगीत टिव्हीने पेट घेतला. टिव्हीला लागलेल्या अागीत टिव्ही व सेट टाॅप बाॅक्स व वायरी जळून १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. या वेळी निघालेल्या धुरामुळे हा प्रकार उघड झाला. या परिसरातील नागरिकांनी रेती व मातीच्या सहाय्याने अाग नियंत्रणात अाणली. शेजारीच असलेल्या डाॅ. प्रशांत जैन यांच्या अथर्व हाॅस्पिटलमध्ये १६ दिवसांपासून अायसीयुत उपचार घेत असलेल्या रुग्ण विद्युत दाब वाढल्याने पार्वताबाई निंबा साेनवणे (वय ६५) यांना लावलेल्या माॅनिटरने अचानक पेट घेऊन धूर निघाला. त्यांना उपस्थित असलेल्या नर्स व सहाय्यांनी मॉनिटरच्या पीन काढून व बेड बाजूला अाेढून वाचवले. याच रुग्णालयातील दुसऱ्या रुममध्ये उपचार घेत असलेले वाहतूक शाखेचे पाेलिस भाऊराव इंगळे यांना लावलेल्या माॅनिटरनेही पेट घेतला. यात दाेन्ही मॉनिटर जळाल्याने सुमारे १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले. याच परिसरातील पुंडलीक विठ्ठल साेनवणे व डाॅ. सचिन अहिरे या दाेघांच्या घरातील इन्व्हर्टर जळाले. दरम्यान, नुकसानग्रस्त नागरिकांनी याप्रकरणी महावितरणचे अभियंत्यांकडे नुकसान भरपाईची मागणी करणारे निवेदन दिले अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.