आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किनाेद येथे पिता-पुत्राकडून विद्युत सहायकास मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- तालुक्यातील किनोद येथे वीज गेलेली असताना दुरुस्तीसाठी गेलेल्या विद्युत सहायकाला बाप व मुलाने मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


किनोद (ता. जळगाव) येथे चार ते पाच घरांमधील वीजपुरवठा खंडित झालेला होता. याबाबत ग्रामपंचायतीचे शिपाई दिलीप बनसोडे यांनी विद्युत सहायक किशोर वना जगताप (रा. चौगाव, ता. चोपडा) यांना मोबाइलव्दारे संपर्क साधून कळवले. त्यानंतर जगताप हे त्यांचा सहायक रामदास सोनवणे यांच्यासह दुपारी ३ वाजता किनोद येथे गेलेले होते. तेथे जाऊन दुरुस्ती करीत असताना दुपारी ४ वाजेच्या सुमारास छोटू शांतीलाल सपकाळे (वय ४०) हा तेथे आला. विद्युत सहायक व त्याच्या सहायकाला त्याने शिवीगाळ करीत माझ्या घरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे, तो दुरुस्त करा असे सांगितले. विद्यूत सहाय्यक जगताप यांनी त्यांना विजबील भरले आहे का, अशी विचारणा केली. त्याने दोघांना शिवीगाळ करून दमदाडी केली. त्यानंतर छोटू व त्यांचा मुलगा गणेश यांनी जगताप यांची कॉलर धरून त्यांना माराहाण केली.

बातम्या आणखी आहेत...